पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे बिहार मंत्रिमंडळाची बैठक संपली आहे. बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदी यशस्वी करण्यासाठी बैठकीत सर्वात मोठा निर्णय घेण्यात ( liquor ban scheme in Bihar ) आला. शाश्वत उपजीविका योजनेंतर्गत देशी दारू किंवा ताडीचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या कुटुंबांना एक लाख रुपयांची मदत देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
दारूचा व्यवसाय करणाऱ्यांना योजना : अत्यंत गरीब आणि अनुसूचित जातीच्या लोकांना एक लाख रुपये दिले जाणार आहेत. जे घर चालवण्यासाठी देशी दारू किंवा ताडीचे उत्पादन आणि विक्री ( one lakh financial help liquor businessmen ) करतात. योजनेशी संबंधित अनुसूचित जमातीची कुटुंबांना या योजनेची फायदा होमार आहे. सरकारचे म्हणणे आहे की या पैशातून दारू आणि ताडीच्या व्यवसायात गुंतलेले लोक स्वतःसाठी नवीन रोजगार निर्माण करू शकतील. ग्रामविकास विभाग बचतगटांच्या माध्यमातून ही मदत सरकार करणार ( Bihar government Appeal stop liquor business ) आहे.
1 लाख रुपयांची आर्थिक मदत : मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहार मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला ( New plan for liquor ban in Bihar ) आहे. जे दारू व्यवसाय करतात त्यांनी ते सोडून द्यावे आणि सरकारने दिलेल्या मदतीचा लाभ घ्यावा. दारू व्यवसाय सोडणाऱ्यांना राज्य सरकार एक लाख रुपयांची आर्थिक मदत करणार आहे.
काय म्हणाले नितीश कुमार : 26 नोव्हेंबरला सीएम नितीश म्हणाले होते की दारू आरोग्यासाठी आणि निरोगी समाजासाठी चांगली नाही. त्यामुळे दारू सोडा. दारू व्यवसाय सोडणाऱ्यांना राज्य सरकार एक लाख रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, त्यांचे सरकार जास्तीत जास्त लोकांना दारूमुक्त करण्यासाठी मोहीम राबवत आहे. सरकार पूर्णपणे मिशन मोडमध्ये गुंतले आहे. तरीही गडबड करणारे काही लोक गडबड करत आहेत. संपूर्ण दारूबंदीमुळे बिहारमध्ये समृद्धी येईल, असा त्यांच्या सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे दारूचा व्यवसाय करणाऱ्यांनी तो सोडून सरकारकडून मिळणाऱ्या मदतीचा लाभ घ्यावा.