ETV Bharat / bharat

Government Job 2023 : सरकारी नोकरीचे बंपर गिफ्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देणार 70 हजार तरुणांना नियुक्तीपत्रे - रोजगार मेळावा 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी रोजगार मेळाव्यात सरकारी आणि इतर संस्थांमधील नवनियुक्त उमेदवारांना 70 हजार नियुक्ती पत्रांचे वाटप करणार आहेत. यापूर्वी 16 मे 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 71 हजार उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले होते.

PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : Jun 13, 2023, 12:39 PM IST

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना सरकारी नोकरीचे बंपर गिफ्ट दिले आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सरकारी आणि इतर संस्थांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या तब्बल 70 हजार उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप करणार आहेत. यावेळी नवनियुक्त कर्मचाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करणार आहेत.

देशभरात 43 ठिकाणी रोजगार मेळावा : देशभरात 43 ठिकाणी रोजगार मेळावा आयोजित केला जाणार आहे. या उपक्रमाला पाठिंबा देत, केंद्र सरकारच्या सर्व विभागांमध्ये तसेच राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नियुक्त्या केल्या जात आहेत. आर्थिक सेवा विभाग, पोस्ट विभाग, शालेय शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण मंत्रालय, महसूल विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, अणुऊर्जा विभाग, रेल्वे मंत्रालय अशा देशभरातून निवडलेल्या नवीन भरती, लेखापरीक्षण, लेखा विभाग आणि गृह मंत्रालय आदींसह विविध विभागांमध्ये सरकारी सेवेत हे तरुण सहभागी होणार आहेत.

रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य : रोजगार मेळा हा रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. रोजगार मेळावा पुढील रोजगार निर्मितीमध्ये उत्प्रेरक म्हणून काम करणार आहे. तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रीय विकासात सहभागासाठी या रोजगार मेळाव्यामुळे अर्थपूर्ण संधी प्रदान करणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

400 हून अधिक ई-लर्निंग अभ्यासक्रम : आयजीओटी कर्मयोगी पोर्टलवरील ऑनलाइन मॉड्यूल, कर्मयोगी स्टार्ट द्वारे स्वतःला प्रशिक्षित करण्याची संधीही नव्याने सरकारी सेवेत आलेल्या उमेदवारांना मिळणार आहे. या सेवेत 400 हून अधिक ई-लर्निंग अभ्यासक्रम 'कुठेही कोणत्याही डिव्हाइस' लर्निंग फॉरमॅटमध्ये उपलब्ध आहेत.

१० लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 मे 2023 रोजी 71 हजार तरुणांना नियुक्ती पत्र दिले होते. गेल्या वर्षी जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी दीड वर्षात मिशन मोडमध्ये १० लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्याची घोषणा केली होती. जून 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सरकारी मंत्रालये आणि विभागांमधील रिक्त पदांचा आढावा घेतला, त्यानंतर भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा -

  1. PM Narendra Modi on chhatrapati shivaji : शिवाजी महाराजांनी लोकांमधील गुलामगिरीची मानसिकता संपविली-पंतप्रधान
  2. पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा द्विपक्षीय संबंधांसाठी नवा निकष प्रस्थापित करेल: पेंटागॉन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.