नवी दिल्ली Google Maps Bharat : देशात गेल्या काही दिवसांपासून 'इंडिया' ऐवजी 'भारत' नाव वापरण्यावर चर्चा सुरू आहे. जी २० परिषदेदरम्यान 'भारत' नावाचा अधिकृतपणे उल्लेख करण्यात आला. त्यानंतर देशाचं नाव बदलण्याची मागणी जोर धरू लागली. आता या प्रकरणात गुगलनंही उडी घेतली आहे.
'India' आणि 'Bharat' दोन्ही नावांनी सर्च होतंय : गुगल मॅप्सवर आता 'India' आणि 'Bharat' अशा दोन्ही नावांनी सर्च केल्या जातंय. तुम्ही जर आता गुगल मॅप्सवर 'Bharat' असं सर्च केलं, तर त्या ठिकाणी आपल्या देशाचा तिरंगा ध्वज दिसतो. याशिवाय 'Bharat' सर्च केल्यानंतर, 'कंट्री इन साउथ एशिया' असंही दाखवलं जातंय. विशेष म्हणजे, तुम्ही गुगल मॅप्स हिंदी किंवा इंग्रजीमध्ये वापरत असला तरीही त्यावर 'भारत' सर्च केल्या जाईल.
अधिकृत घोषणा नाही : गुगल मॅप्सच्या हिंदी आवृत्तीमध्ये, 'भारत' असं सर्च केल्या जातंय. तर, इंग्रजी भाषेत 'India' असं सर्च होतंय. केवळ गुगल मॅप्सच नाही तर गुगलच्या इतर सेवांमध्येही आता 'इंडिया' आणि 'भारत' असे दोन पर्याय उपलब्ध झाले आहेत. गुगलनं याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र सर्च रिझल्टमध्ये हे दिसून येतंय. याशिवाय, गुगल ट्रान्सलेटमध्ये India हा शब्द टाकल्यास भारत, हिंदुस्तान, भारतवर्ष असे रिझल्ट येत आहेत.
पुन्हा एकदा नव्यानं चर्चा सुरू : नुकतेच, एनसीईआरटीनं (NCERT) आपल्या सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये देशाचं नाव 'इंडिया' ऐवजी 'भारत' करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. एनसीईआरटी पॅनलनं सार्वमतानं ही शिफारस केली होती. याशिवाय, रेल्वे मंत्रालयानं आपल्या एका प्रपोजलमध्ये देशाचं नाव 'इंडिया' ऐवजी 'भारत' असं वापरल्याचं वृत्त आलं होतं. या पार्श्वभूमीवर आता गुगलनं केलेला हा बदल पाहून पुन्हा एकदा नव्यानं चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा :