हैदराबाद : भारताच्या नावावर 23 ऑगस्ट 2023 ला अशा ऐतिहासिक क्षणाची नोंद झाली, जेव्हा भारतीय चंद्रयान 3ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वीपणे उतरून इतिहास रचलायं. असे करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. या यशाचा आनंद देश-विदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जात आहे. प्रसिद्ध सर्च इंजिन गुगलनेही या निमित्ताने आनंदोत्सव साजरा केलाय. गुगलने डूडल करुन हा खास क्षण साजरा केला.
- गुगलने डूडलद्वारे साजरा केला आनंद : गुगलने डूडल बनवताना त्यात चंद्र आणि चंद्रयान बनवले आहे. डूडलमध्ये एक GIF व्हिडिओ देखील आहे. ज्यामध्ये गुगल स्पेलिंगचा (GOOGLE) दुसरा ओ हा चंद्र दाखवला आहे. पार्श्वभूमीत तारे आहेत. चंद्रयान ३ चे आगमन आणि चंद्राच्या पृष्ठभागावर उतरते, त्यानंतर चंद्र आनंदी होतो, असे त्यामध्ये दिसते.
- संपूर्ण जगाचे लक्ष : चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ चंद्रयान 3 उपग्रहाच्या लँडिंगवर संपूर्ण जगाच्या नजरा खिळल्या होत्या. या यशामुळे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा पहिला देश ठरला आहे. यासह चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत चौथा देश ठरला आहे. भारतापूर्वी रशिया, चीन आणि अमेरिकेने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले आहे.
- 14 जुलै रोजी चंद्रयान लाँच : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने 14 जुलै रोजी सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा येथून 3,897.89 किलो वजनाचे चंद्रयान 3 अंतराळ यान प्रक्षेपित केले. 42 दिवसांच्या प्रवासानंतर चंद्रयान 3 चे लँडर चंद्रावर यशस्वीरित्या उतरले.
चंद्रयानांचा प्रवास : सर्वप्रथम, 2008 मध्ये चंद्रयान-1 चे यशस्वी प्रक्षेपण भारताला चंद्राच्या दिशेने घेऊन गेले आणि अंतराळ संशोधनात नवीन उंची गाठण्याची क्षमता देशाने दर्शविली. यानंतर, 2019 मध्ये चंद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणाने भारताच्या अंतराळ संशोधनात आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले, जे चंद्राच्या अभ्यासासाठी महत्त्वाचे आहे. आता 2023 मध्ये चंद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर, संपूर्ण जगाच्या नजरा भारताकडे लागल्या आहेत, ही भारतीय अंतराळ संशोधन (ISRO) क्षेत्रातील एक मोठी उपलब्धी आहे.
हेही वाचा :