ETV Bharat / bharat

Gold Smuggling : दुरंतो एक्सप्रेसमधून सोन्याची तस्करी; डीआरआयने जप्त केले 7 कोटीचे सोने

author img

By

Published : Jun 11, 2023, 5:40 PM IST

दुरंतो एक्सप्रेसमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन तस्करांना डीआरआयच्या पथकाने अटक केली आहे. या तस्करांकडून 7 कोटी 72 लाखाचे सोने जप्त करण्यात आले आहे. बांग्लादेशातून हे सोने दिल्लीत नेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Gold Smuggling
सोन्याची तस्करी

पाटणा : दुरंतो एक्सप्रेसमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन तस्करांच्या डीआरआयच्या पथकाने मुसक्या आवळल्या. या तस्करांकडून 7 कोटी 72 लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. हावडा ते नवी दिल्ली रेल्वे क्रमांक 12273 या दुरंतो एक्सप्रेसमधून ही सोन्याची तस्करी करण्यात येत होती. प्रेमल राडिया आणि अनिल कुमार असे डीआरआयने पकडलेल्या दोन तस्करांची नावे आहेत.

पाटणा स्टेशनवर करण्यात आली कारवाई : डीआरआयच्या पथकाने मोठ्या कारवाईत पाटणा जंक्शनवर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. रेल्वे क्रमांक 12273 हावडा नवी दिल्ली दुरंतो एक्स्प्रेसमधून सोन्याची बिस्किटे दिल्लीकडे घेऊन जात असताना पाटणा जंक्शनवर ढीआरआयच्या पथकाने 42, 43 क्रमांकाच्या सीटवर B7 कोचमध्ये प्रवास करणाऱ्या दोघांना अडवून त्यांची झाडाझडती घेतली. यावेळी प्रेमल राडिया आणि अनिल कुमार यांच्या कमरेतून 12 किलो 600 ग्रॅम सोन्याचे बिस्किट आढळून आले. दोघांनी कमरेला बेल्ट बांधून सोन्याचे बिस्किट लपवले होते. या छाप्यात डीआरआय आणि आरपीएफच्या पथकाने मोठ्या तत्परतेने सोने तस्करांना जेरबंद केले आहे.

बांग्लादेशातून सुरू होती सोन्याची तस्करी : छापेमारीत जप्त करण्यात आलेल्या 12 किलो 600 ग्रॅम सोन्याची किंमत 7 कोटी 72 लाख 61 हजार 125 रुपये आहे. हे सोन्याचे कनेक्शन बांगलादेशचे असल्याचे सांगितले जात आहे. बांगलादेशातील हे दोन्ही तस्कर सोने घेऊन दिल्लीला रवाना झाले होते. मात्र याची माहिती डीआरआयच्या पथकाला मिळाली होती. त्यामुळे या दोन्ही तस्करांना पाटणा जंक्शनवरच अटक करण्यात आली. पकडण्यात आलेल्या तस्करांचा संबंध कोणाशी आहे, याबाबतचा तपास डीआरआयकडून सुरू करण्यात आला आहे.

बिहारबाहेर सोने तस्करांच्या टोळीचे धागेदोरे : डीआरआयने दोन तस्करांना अटक करुन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात सोने जप्त केले आहे. या दोन तस्करांशी संबंधित इतर कोण कोण आहेत, त्यांची टोळी बिहारबाहेर तसेच राज्यात सक्रिय असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांना आहे. म्हणूनच त्यांच्या नेटवर्कमध्ये सामील असलेल्या तस्करांना पकडण्यासाठी डीआरआय टीम, आरपीएफ आणि इतर पोलीस दलांच्या मदतीने कारवाई सुरू करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.