पणजी- राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आमदार प्रतापसिंह राणे ( EX CM MLA Pratap Singh Rane ) यांनी आपल्या राजकीय आयुष्याची 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल भाजपा सरकारने त्यांना आजीवन कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा बहाल केला ( Lifetime Cabinet Status To Pratap Singh Rane ) आहे. राणे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्ष राहिले आहेत.
प्रतापसिंह राणे यांच्या 50 वर्षाच्या राजकीय करकीर्दीवर एक नजर
- विद्यमान पर्ये मतदारसंघाचे आमदार
- प्रतापसिंग राणे यांनी. १९८०-१९८५, १९८५-१९८९, १९९० मध्ये ३ महिने, १९९४-१९९९, ३ फेब्रुवारी २००५ पासून ४ मार्च २००५ पर्यंत, जून २००५- जून २००७ अश्या ६ वेळा गोव्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे.
- राणे १९७०च्या दशकापासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात आहेत.
- त्याआधी ते महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षात होते.
- मगोपच्या १९७२ च्या सरकारात त्यांनी कायदा खाते सांभाळले होते.
- गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून १६ जानेवारी १९८० रोजी प्रथम शपथ घेतली.
- दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ ८ जानेवारी १९८५ रोजी घेतली