ETV Bharat / bharat

गोव्यात २० ठिकाणे हॉटस्पॉट म्हणून घोषित, कोरोनामुळे आणखीन ३० बळी - गोवा कोरोना अपडेट न्यूज

गुरुवार आणि शुक्रवार दरम्यानच्या चोवीस तासात आरोग्य खात्याने ५,२७३ जणांचे नमुने गोळा केले होते. त्यातील ५,०६३ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये १,६२५ पॉझिटिव्ह, तर ३,४३८ जण निगेटिव्ह आले. त्यामुळे बाधित होण्याचा घटून ३२.१० टक्क्यांवर आला आहे. राज्यातील एकूण बळींचा आकडा २,३०२ झाला आहे.

गोव्यात २० ठिकाणे हॉटस्पॉट म्हणून घोषित
गोव्यात २० ठिकाणे हॉटस्पॉट म्हणून घोषित
author img

By

Published : May 22, 2021, 9:29 AM IST

पणजी (गोवा) - गेल्या चोवीस तासात राज्यात आणखी ३० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर १,६२५ नवे रुग्ण आढळून आले. शिवाय ३,०७५ जण कोरोनातून बरे झाले आहेत. नव्या ३० मृतांमध्ये दोन्ही डोस घेतलेल्या करंझाळे येथील ५३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे, अशी माहिती गोव्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील २० ठिकाणे हॉटस्पॉट म्हणून घोषित आहेत.

अशी आहे कोरोनाबाधितांची स्थिती -

३० पैकी ११ जणांचा दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात, ९ जणांचा गोमेकॉत, प्रत्येकी चार जणांचा दक्षिण व उत्तर गोव्यातील खासगी​ रुग्णालयात, तर ईएसआय आणि कुडतरी रुग्णालयात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. गुरुवार आणि शुक्रवार दरम्यानच्या चोवीस तासात आरोग्य खात्याने ५,२७३ जणांचे नमुने गोळा केले होते. त्यातील ५,०६३ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये १,६२५ पॉझिटिव्ह, तर ३,४३८ जण निगेटिव्ह आले. त्यामुळे बाधित होण्याचा घटून ३२.१० टक्क्यांवर आला आहे. राज्यातील एकूण बळींचा आकडा २,३०२ झाला आहे. तर १ ते २१ मे या कालावधीत १,११९ जण करोनामुळे दगावले आहेत. शुक्रवारी तासांत आणखी १८७ जणांना कोविड रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सक्रिय बाधितांची संख्या कमी होऊन १९,३२८ झाली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत सापडलेल्या करोनाबाधितांचा आकडा १,४३,१९२ झाला असून, त्यातील १,२१,५६२ जणांनी करोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे.

मृतांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस घेतलेल्यांचा समावेश

कोरोनामुळे शुक्रवारी मृतझालेल्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेला एक रुग्ण दगावला आहे. नव्या ३० मृतांत दोन्ही डोस घेतलेल्या करंझाळे येथील ५३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर एक डोस घेतलेल्या वास्को व राय येथील दोघांचा मृत्यू झाला आहे. ३० पैकी चारजण ५० वर्षांखालील आहेत. त्यात मरड येथील ४२, ताळगावातील ४१, गडचिरोली येथील ३९ आणि वेर्णा येथील ४४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. एका व्यक्तीला मृत झाल्यानंतर, तर तिघांना चोवीस तासांपूर्वी उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.

राज्यातील २० ठिकाणे हॉटस्पॉट म्हणून घोषित

राज्यातील २०८ ठिकाणी सध्या कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यातील बहुतांश घरीच विलगीकरणात राहून कोरोनावर उपचार घेत आहेत. दोन्ही जिल्ह्यांत प्रत्येकी १० याप्रमाणे सुमारे २० ठिकाणी प्रथमच रुग्ण आढळले आहेत, जे ‘हॉटस्पॉट’ म्हणून नोंद केले गेले आहेत. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रिव्हेंटीव्ह अँड सोशल मेडिसीन विभागाच्या डॉक्टरांनी तयार केलेल्या अहवालात गोव्यातील २० भाग हे नवे हॉटस्पॉट असल्याचे म्हटले आहे.

गोमेकॉत दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये ५० टाक्यांनी घट

गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारांसाठी दाखल होणाऱ्या करोनाबाधित रुग्नांमध्य सुमारे ५० टक्क्यांची घट झाली आहे. पण, दुसरी लाट नियंत्रणात आली असे आताच म्हणता येणार नाही. त्यासाठी आणखी काही दिवस वाट पहावे लागेल, असे गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी स्पष्ट केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.