ETV Bharat / bharat

Dayanand Mandrekar : भाजपचे दयानंद मांद्रेकर पाचव्यांदा आमदारकीच्या शर्यतीत, एक नजर त्यांच्या कारकिर्दीवर

author img

By

Published : Mar 9, 2022, 5:43 PM IST

भाजपचे दयानंद मांद्रेकर (BJP leader Dayanand Mandrekar) 4 वेळा आमदार आणि दोन वेळा मंत्री राहिले आहेत. ते सिओलिम मतदारसंघातून (Siolim constituency) पुन्हा मैदानात उतरले आहेत. जनता त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना पुन्हा विजयी करणार का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

Goa Election BJP leader Dayanand Mandrekar
दयानंद मांद्रेकर सिओलिम मतदारसंघ

पणजी (गोवा) - गोव्यातील विधानसभा निवडणुकीचा ( Goa Election Result Date ) निकाल १० मार्चला लागणार आहे. ४० जागांसाठी झालेल्या या मतदान प्रक्रियेत ३०१ उमेदवारांनी भाग्य अजमावले. 78.94 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत आपला कौल दिला आहे. गोव्यात सत्ता कोणाच्या ताब्यात जाणार, मुख्यमंत्री कोण होणार हा सध्या चर्चेचा विषय आहे. त्याचबरोबर, काही महत्वाच्या पक्षांतील नेत्यांकडे गोवाकरांचे लक्ष आहे. भाजपचे दयानंद मांद्रेकर (BJP leader Dayanand Mandrekar) त्यापैकीच एक. ते 4 वेळा आमदार आणि दोन वेळा मंत्री राहिले आहेत. ते सिओलिम मतदारसंघातून (Siolim constituency) पुन्हा मैदानात उतरले आहेत. जनता त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना पुन्हा विजयी करणार का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

Goa Election BJP leader Dayanand Mandrekar
भाजपचे दयानंद मांद्रेकर यांची कारकीर्द

हेही वाचा - Goa Election 2022 : पणजीत उत्पल पर्रीकरांमुळे भाजपाची प्रतिष्ठा लागली पणाला..

मांद्रेकर यांची आतापर्यंतची कारकीर्द

..या कारणामुळे ठरवले अपात्र

भाजपचे दयानंद मांद्रेकर (BJP leader Dayanand Mandrekar) यांनी 4 टर्म सिओलिम मतदारसंघाचे (Siolim constituency) प्रतिनिधित्व केले आहे. ते 1999 च्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून पहिल्यांदा गोवा विधानसभेवर निवडून आले. 2002, 2007 आणि 2012 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सिओलीम राखले. 2005 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना लाभाचे पद धारण केल्याच्या कारणावरून अपात्र ठरवले होते. त्या विरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. पण, तेथेही त्यांच्या अपात्रतेचा निकाल कायम राहिला. परिणामी, मांद्रेकरांना त्यांचे पद गमवावे लागले होते.

..या मंत्रिपदांवर केले काम

गोवा विधानसभेनंतर 2002 मध्ये मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापन केले. दयानंद मांद्रेकर यांनी 3 जून 2002 ते 2 फेब्रुवारी 2005 पर्यंत पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले. त्यावेळी त्यांच्याकडे कृषी, पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा, तसेच अपारंपारिक उर्जा मंत्र्यालयाचा कारभार होता. २०१२ च्या निवडणुकीनंतर भाजपने पुन्हा सत्ता मिळवली तेव्हा मांद्रेकर यांना कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांना जलसंपदा, नागरी पुरवठा, तसेच कला आणि सांस्कृतिक मंत्रालयाचा कारभार देण्यात आला होता.

..या कारणामुळे झाले होते नाराज

मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांची केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर, लक्ष्मीकांत पार्सेकर हे गोव्याचे मुख्यमंत्री झाले. मांद्रेकर यांनी या सरकारमध्येही कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले आणि पंचायत, नागरी पुरवठा आणि किंमत नियंत्रण, जलसंपदा, पुरातत्त्व कला आणि संस्कृती या मंत्रालयांचा कारभार सांभाळला. ऑक्टोबर 2015 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या फेरबदलात, मांद्रेकर यांच्याकडून पंचायत खाते काढून घेण्यात आले आणि ते राजेंद्र आर्लेकर यांना देण्यात आले. मांद्रेकर यांनी पंचायत खात्याचा कार्यभार सोडण्यापूर्वी आपला सल्ला घेतला गेला नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी नमूद केले की, पोर्टफोलिओ काढून घेतल्याबद्दल ते नाराज नव्हते. परंतु, त्यापूर्वी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याशी सल्लामसलत न केल्यामुळे ते नाराज होते.

'हा' वाद चांगलाच गाजला

डिसेंबर 2016 मध्ये, मांद्रेकर यांना पुरातत्त्व विभागाचा कारभार देण्यात आला. मांद्रेकर यांनी खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. ते गोवा मीट कॉम्प्लेक्स लि.चे अध्यक्ष आणि उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे सदस्य होते. 2017 च्या निवडणुकीत ते गोवा फॉरवर्ड पार्टीच्या विनोद पालीनकर यांच्याकडून पराभूत झाले होते. कला आणि संस्कृती मंत्री या नात्याने त्यांनी नायजेरियन लोकांची गोव्यातील ‘कॅन्सर’शी तुलना केली होती. हा वाद चांगलाच गाजला होता. त्यांनंतर त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली.

हेही वाचा - Goa Election 2022 : मायकल लोबो : सर्वात श्रीमंत उमेदवार.. गोव्यात सत्तास्थापनेत बजावणार महत्वाची भूमिका..?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.