पणजी - गोवा राज्याच्या 60 व्या मुक्तिदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी गोव्यात येणार आहेत. तत्पूर्वी काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन मोदींनी राजाच्या ज्वलंत प्रश्नांविषयी उत्तर देण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा - Section 144 In Belgaum : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांसह २७ जणांची हिंडलगा कारागृहात रवानगी
उद्या गोव्यात दाखल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र 60 व्या गोवा मुक्तिदिनाच्या विविध कार्यक्रमांत सहभागी होणार आहेत. पण, त्यांच्या या दौऱ्यापूर्वीच काँग्रेसने राज्यातील विविध प्रश्नांची उत्तरे मोदी यांनी द्यावी, अशी मागणी केली आहे.
काँग्रेस ने उपस्थित केलेले प्रश्न?
1) कोविड काळात गोवा वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी झालेले मृत्यू व त्याला जबाबदार कोण?
2) राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था?
3) राज्यातील महिला अत्याचार.
4) मंत्री मिलिंद नाईक यांच्यावरील लैंगिक शोषणाचे आरोप व त्याच्यावर मोदींची प्रतिक्रिया?
5) सरकारी नोकर भरती घोटाळा कोणी केला व या रॅकेटमध्ये कोण सहभागी आहेत?
6) देशात आणि राज्यात वाढलेले इंधन आणि गॅस दरवाढ?
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन हे प्रश्न नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी उपस्थित केले आहेत. त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष गिरीश चोदणकार व माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप उपस्थित होते.