पणजी - गोव्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी हा 28 मार्चला होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत.
यंदा गोव्यात भाजपाला 20 जाग -
गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला २० जागा मिळाल्या आहेत. ( Bjp Won Goa Election 2022 ) सोबत ३ अपक्ष आमदार आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या (एमजीपी) २ आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. अस्थिर गोव्यात भाजप पहिल्यांदाच मजबूत स्थितीत आहे.
हेही वाचा - Goa CM BPJ Candidate : गोवा मुख्यमंत्री निवडीवर देवेंद्र फडणवीस यांची 'ईटीव्ही भारत'सोबत खास मुलाखत
हे मंत्री घेणार शपथ -
भाजपने राज्यात सत्ता मिळवल्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री म्हणून डॉ प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. बांबोली येथील डॉ श्यामा प्रसाद इनडोअर स्टेडियम मध्ये हा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. 28 मार्च ला सोमवारी सकाळी 11 वाजता हा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत विश्वजित राणे, महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर, अपक्ष आमदार चंद्रकांत शेट्ये, आलेक्स रेजिनाल्ड आणि आंतोन वाझ्झ हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.