पणजी गोवा मुक्ती संग्रामात Goa Liberation War martyr सहभागी व हुतात्मा झालेल्या स्वतंत्र सैनिकांची नावे राज्यातील प्राथमिक शाळांना देणार independent soldiers name to goa primary school असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत Goa CM Dr Pramod Sawant यांनी स्वातंत्र्यदिनाप्रसंगी Independent day in goa केली. ते आज सकाळी जुन्या सचिवालय येथील स्वतंत्र दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
गोव्याच्या प्रगतीचा मांडला लेखाजोगा पणजी येथील जुन्या सचिवालयात समोर मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आज सकाळी ध्वजारोहण केले. साठ वर्षांपूर्वी गोव्यात पहिल्यांदा ज्या ध्वजस्तंभावरती पहिला स्वातंत्र्याचा पहिला तिरंगा फडकला होता त्याच ध्वज स्तंभावरती ध्वजारोहण करताना आपल्याला आनंद होत असल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगितले. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गोवा राज्य पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त झाल्यानंतर मागच्या 61 वर्षांत कशा पद्धतीने प्रगती झाली व पुढच्या पंचवीस वर्षांत काय प्रगती करणार आहे याचा लेखाजोखा मांडला. सध्या राज्यात चालू असलेल्या विविध विकास काम त्याचप्रमाणे गोवा स्वयंपुरतीकडे वाटचाल करीत असताना आपल्या सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा त्यांनी आपल्या भाषणात मांडला.
स्वातंत्र्य सैनिकांच्या नातेवाईकांचा यथोचित सन्मान गोवा स्वतंत्र संग्रामात सहभागी झालेल्या व शहीद झालेल्या स्वतंत्र सैनिकांची नावे राज्यातील प्राथमिक शाळांना देऊन त्या स्वतंत्र सैनिकांचा गौरव करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिकांच्या नातेवाईकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. गोव्याच्या मुक्तिसंग्रामात सहभागी झालेल्या महाराष्ट्र कर्नाटक व इतर राज्यातील स्वतंत्र सैनिकांच्या नातेवाईकांचा यावेळी सन्मान करण्यात आला आहे. राज्य सरकारने प्रत्येक क्षेत्रात यशस्वी घोडदौड चालू ठेवली असून राज्य सध्या स्वयंपुरतीकडे वाटचाल करीत आहे. प्रत्येक क्षेत्रात गोव्याला स्वयंपूर्ण बनवित असल्याचे मुख्यमंत्री सावंत आपल्या भाषणात म्हणाले. यावेळी त्यांनी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत त्यांच्या सहकार्यामुळेच आपण स्वयंपूर्ण गोवा च्या दिशेने वाटचाल करत असल्याचे सांगितले.