ETV Bharat / bharat

Goa Ministers : असं आहे गोव्यातील मंत्रिमंडळ; 'या' आमदारांना मिळाली संधी... - गोव्यातील मंत्रिमंडळ 'या' आमदारांना मिळाली संधी

विधानसभा निवडणुकीत बहुमत प्राप्त झाल्यानंतर डॉ. प्रमोद सावंत ( Dr. Pramod Sawant ) यांनी गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची शपध घेतली आहे. सावंत आता गोव्याचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. डॉ. सावंत यांच्यासह एकूण नऊ जणांनी यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली

Goa Ministers
असं आहे गोव्यातील मंत्रिमंडळ
author img

By

Published : Mar 28, 2022, 12:04 PM IST

Updated : Mar 28, 2022, 1:38 PM IST

पणजी ( गोवा ) - विधानसभा निवडणुकीत बहुमत प्राप्त झाल्यानंतर डॉ. प्रमोद सावंत ( Dr. Pramod Sawant ) यांनी गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची शपध घेतली आहे. सावंत आता गोव्याचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपाशासित सर्व राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते. डॉ. सावंत यांच्यासह एकूण नऊ जणांनी यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली

असं आहे गोव्याचं मंत्रिमंडळ -

  1. प्रमोद सावंत - प्रमोद सावंत हे 2012 मध्ये पहिल्यांदा गोव्यातील साखळी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यावेळी त्यांच्या कोल्हापूरच्या 1997 च्या बॅचने सत्कार केला होता. त्यानंतर ते दुसऱ्यांदा विजयी झाले आणि विधानसभेचे अध्यक्ष झाले. पुढे दिवंगत भाजप नेते मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर प्रमोद सावंत यांची पहिल्यांदा 2019 मध्ये मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती.
  2. विश्वजित राणे - माजी मुख्यमंत्री आणि गोव्याचे मुरब्बी राजकारणी प्रतापसिंह राणे गेल्या ३२ वर्षांपासून पोरियम या मतदारसंघातून निवडून येत आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने त्यांना दोन पर्याय दिले होते. पोरियम येथून स्वतः लढा किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याचे नाव पुढे करा. त्यामुळे विश्वजित राणे येथून निवडणूक लढण्यास उत्सूक होते. पण प्रतापसिंह यांनी विश्वजित राणे यांची पत्नी दिव्या राणे यांचे नाव पुढे केले. दिव्या व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांना एकूण 17,816 मते पडली. सर्वाधिक मताधिक्याने त्या निवडून आल्या. वलपोई येथून विश्वजित राणे यांना 12,262 मते पडली. त्यांचाही मोठ्या मतांनी विजय झाला आहे.
  3. नीलेश काब्राल - नीलेश काब्राल हे गोव्याचे वीजमंत्री होते. कुडचडे मतदारसंघातून त्यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. यावेळी त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे.
  4. रवी नाईक - राज्याचे माजी मुख्यमंत्री व आमदार रवी नाईक (Former CM Ravi Naik Enters BJP) यांनी विधानसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली. रवी नाईक हे फोंडयाचे काँग्रेस आमदार होते. मात्र, त्यांनी निवडणुकीआधी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा सभापती राजेश पाटनेकर यांच्याकडे सुपुर्द केला होता आणि भाजपमध्ये प्रवेश केला. फोंडा हा रवी नाईक यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. 1980 साली त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्र गोमंतक पक्षाकडून निवडणूक लढवली होती. 1991 साली त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 1994 साली ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. रवी नाईक यांनी आपल्या काँग्रेस सरकारच्या कारकिर्दीत सार्वजनिक बांधकाम खाते, पशुपालन व संवर्धन, महिला व बालविकास, विज्ञान व तंत्रज्ञान आदी खात्यांचे मंत्री म्हणून काम केले.
  5. सुभाष शिरोडकर - भाजपचे आमदार सुभाष शिरोडकर हे शिरोड्याचे प्रतिनिधित्त्व करतात. यावेळी त्यांना डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे.
  6. रोहन खवाटे - अपक्ष आमदार रोहन खवटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या निवडणुकीत ते निवडून आल्यावर त्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. विधानसभेत एकमेकांचे कट्टर वैरी असणारे रोहन खवटे यांनी आपण आपली विचारधारा कधीही बदलणार नसून फक्त गोव्याच्या विकासासाठी आपण भाजपात पक्षप्रवेश करत असल्याचे खवटे म्हणाले होते.
  7. गोविंद गवाडे - गोविंद गवाडे हे मागच्या सरकारमध्ये आदिवासी कल्याण मंत्री होते. प्रियोळ या मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. यावेळी प्रमोद सावंत त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
  8. बाबुश मोन्सरात - पणजीतील भाजपाचे उमेदवार बाबुश मोन्सरात यांचे राजकीय आयुष्य नेहमीच विविध आरोपांनी गाजलेले आहे. तरुणीवर बलात्कार केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्यासमोर मोन्सरात यांची राजकीय कारकीर्द कधीच उभारी घेऊ शकली नाही. पहिल्यांदाच पर्रीकर केंद्रात संरक्षण मंत्री झाल्यावर 2017 साली त्यांचे निकटवर्तीय सिद्धार्थ कुंकलीकर या मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजयीही झाले होते. पर्रीकर हे केंद्रातून राज्यात परतले. तेव्हा पर्रीकर मुख्यमंत्री झाल्यानंतर पोटनिवडणुकीत पुन्हा एकदा भाजपैने आपला गड राखला होती. त्यावेळी त्यांच्यासमोर मोन्सरात हे प्रतिस्पर्धी उमेदवार होते. 25 वर्षाहून अधिक काळ भाजपा आणि पर्यायाने पर्रीकर यांनी पणजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र, मार्च 2019 ला पर्रिकरांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पुन्हा एकदा पोटनिवडणुक झाली. प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणुकीत तत्कालिन काँग्रेस उमेदवार बाबुश मोन्सरात यांनी भाजपा उमेदवार सिद्धार्थ कुंकलीकर यांचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला होता. अखेर पहिल्यांदाच 25 वर्षे अबाधित असलेला भाजपचा गड काँग्रेसने जिंकला होता. आता तेच बाबुश मोन्सरात भाजपात असून मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्रा उत्पल यांच्याविरोधात मैदानात होते. या दोघांमध्ये बाबुश मोन्सरात यांनी उत्पल पर्रिकर यांच्या विरोधात विजय मिळवला.
  9. मोविन गुदीनो - दाबोलीम विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मोविन गुदीनो यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. आम्ही 20 ते 21 जागांवर विजयी होणारच, असा आम्हाला विश्वास होता. त्यानुसार आमचे जवळपास 20 ठिकाणी उमेदवार निवडून आले असून जनतेने पुन्हा एकदा भाजपाला साथ दिली असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले असल्याच मत निकालानंतर त्यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना व्यक्त केले होते. दरम्यान, गुदीनो यांच्याविरोधात कॅप्टन विरीआतो फर्नांडिस हे काँग्रेसकडून होते. तर, प्रेमानंद नासोस्कर हे आम आदमी पक्षाचे उमेदवार होते. मागच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे गोव्याचे वाहतूक मंत्रीपदाचा कार्यभार होता.

Last Updated : Mar 28, 2022, 1:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.