चंदीगढ - आता मुलीही ऑल इंडिया सैनिक स्कूलची प्रवेश परीक्षा देऊ शकतील. चंदीगढमध्ये २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी सहाव्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी परीक्षा ठेवण्यता आली आहे.
पहिल्यांदाच सैनिक स्कूल मुलींना सहाव्या वर्गात प्रवेश देण्यासाठी परीक्षा आयोजित करत आहे. मुला-मुलींची ही प्रवेश परीक्षा १० जानेवारीला होणार आहे. तर, नवव्या वर्गातील प्रवेशासाठी याच दिवशी परीक्षा होणार असून ही परीक्षा फक्त मुलांसाठी असेल.
शासकीय परिपत्रकानुसार, कुंजपुरा, कर्नाल सैनिक स्कूलचे प्राचार्य, कर्नल व्ही.डी. चंदोला म्हणाले की, एनटीएद्वारे ही प्रवेश परीक्षा देशातील ३३ सैनिक शाळांमध्ये घेतली जाईल. "कुंजपुरा येथील सैनिक शाळेत सहावीसाठी मुला-मुलींकडून तसेच नववीच्या मुलांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. सहावीच्या मुलांसाठी अंदाजे ८३ जागा आणि मुलींसाठी १० जागा असतील. तर, नववीतील मुलांसाठी कुंजपुरा येथे २२ जागा उपलब्ध असतील," असे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - ज्या हाताने राखी बांधली, त्याच हातावर आज भावाचे अंतिम दर्शन घेण्याची वेळ
अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ नोव्हेंबर आहे. सहावीची परीक्षा हिंदी आणि इंग्रजी भाषेत होईल. तर, नववीची परीक्षा फक्त इंग्रजी भाषेत घेतली जाणार आहे.
हेही वाचा - हिंदू-मुस्लीम एकतेचा आदर्श.. मुस्लीम कुटूंबाकडून मागील २१ वर्षापासून दिवाळीला आपल्या घरात लक्ष्मी-गणेश पूजन