ETV Bharat / bharat

Girlfriend Poisoned Boyfriend: अशी गर्लफ्रेंड नको रे बाबा, ज्योतिष्याच्या सांगण्यावरून बॉयफ्रेंडला ज्यूसमधून पाजले विष - Girlfriend killed boyfriend Kerala

कथित ज्योतिष्याच्या सांगण्यावरून प्रेयसीने प्रियकराला विष पाजून ठार (Girlfriend killed boyfriend Kerala) मारले. आरोपी मुलीने तिच्या प्रियकराला ज्यूसमध्ये विष घालून मारल्याचे (girlfriend poisoned boyfriend by Juice ) समोर आले.

बॉयफ्रेंडला ज्यूसमधून पाजले विष
Girlfriend Poisoned Boyfriend
author img

By

Published : Oct 30, 2022, 9:52 PM IST

तिरुअनंतपुरम (केरळ) : केरळमधील पथनमथिट्टा जिल्ह्यातील मानवबलि प्रकरणानंतर तिरुअनंतपुरमच्या परशाला येथे आणखी एक हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये कथित ज्योतिष्याच्या सांगण्यावरून प्रेयसीने प्रियकराला विष पाजून ठार (Girlfriend killed boyfriend Kerala) मारले. आरोपी मुलीने तिच्या प्रियकराला ज्यूसमध्ये विष घालून मारल्याचे (girlfriend poisoned boyfriend by Juice ) समोर आले.

मुलगा-मुलगी होते प्रेमसंबंधात - नोव्हेंबरपूर्वी लग्न झाल्यास पतीचा मृत्यू होईल, असे ज्योतिषाच्या भाकितानंतर आरोपी ग्रीष्माने होणाऱ्या पतीला विष पाजून मारले. शेरॉन असे मृतकाचे नाव आहे. माहितीप्रमाणे शेरॉन आणि मारलेली ग्रीष्मा यांचे वर्षानुवर्षे प्रेम होते.

खूनामागे मुलीच्या घरच्यांचा पाठिंबा- मात्र मुलीच्या कुटुंबीयांनी सैनिकाशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर अंधश्रद्धेवर मात करण्यासाठी मुलीने हत्येचा निर्णय घेतला. घरच्यांच्या पाठिंब्यावर अशी हत्या केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. ग्रीष्माने कॉपर सल्फेट मिसळलेला रस देऊन ही हत्या केली. आठ तासांच्या चौकशीअंती ग्रीष्माने कबुली दिली.

ज्यूसमध्ये घातले कॉपर सल्फेट - नोव्हेंबर महिन्याच्या १४ तारखेला शेरॉन तामिळनाडूतील रामवरमंचिरा येथील महिलेच्या घरी रेकॉर्ड बुक विकत घेण्यासाठी गेला होता. तिथे तरुणीने दिलेले टिंचर आणि ज्यूस पिणे हे आजारपणाचे कारण असल्याचा आरोप शेरॉनच्या कुटुंबीयांनी केला आहे. हे सिद्ध करण्यासाठी तरुणी आणि तरुणातील व्हॉट्सअॅप चॅटही समोर आले आहेत. ज्यूस चॅलेंजच्या नावाखाली शेरॉन आणि ग्रीष्माने ज्यूस प्यायला. यावेळीही ज्यूसमध्ये विष दिल्याचे निष्पन्न झाले. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, शेरॉन प्रत्येक वेळी मुलीसोबत बाहेर जाताना पोटात दुखते असे सांगायचा. सतत विष प्राशन केल्याने त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.