अमृतसर (पंजाब) : अमृतसरच्या जगप्रसिद्ध सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी आलेली एक मुलगी आणि परिचारक यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सुवर्ण मंदिराच्या सेवकाने तिला आत जाण्यापासून रोखले कारण मुलीने तिच्या चेहऱ्यावर तिरंगा काढला होता. हा भारत नाही तर पंजाब आहे, असे त्या सेवकाने सांगितल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणाने पेट घेतल्यानंतर यावर एसजीपीसीचे वक्तव्यही समोर आले आहे.
स्वातंत्र्य लढ्यात शिखांची भूमिका महत्वाची : एसजीपीसी अधिकारी गुरचरण सिंग ग्रेवाल म्हणाले की, 'कोणाचे मन दुखावले असेल तर आम्ही त्यांची माफी मागतो'. गुरचरण सिंग ग्रेवाल पुढे म्हणाले की, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. ते म्हणाले की लोक ट्विट करत आहेत आणि चुकीच्या कमेंट करत आहेत. येथे येणाऱ्या देश - विदेशातील सर्व लोकांचा आदर केला जातो. देशाच्या स्वातंत्र्यात शीख धर्मीयांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, मात्र तरीही प्रत्येक वेळी शिखांना लक्ष्य केले जाते.
खलिस्तानच्या नावावर शिखांमध्ये फूट पाडण्याचे काम : ते पुढे म्हणाले की, 'कोणताही भक्त दुखावला गेला असेल तर मी माफी मागतो. या तिरंग्यासाठी शिखांनी सर्वाधिक बलिदान दिले आहे. पण त्यावर कोणी बोलत नाही. खलिस्तानच्या नावावर शिखांमध्ये फूट पाडली जात आहे. ते म्हणाला की, 'हा व्हिडिओ एका विशिष्ट हेतूने ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. मी याबद्दल काहीही बोलू शकत नाही'.
काही खोडकर व्यक्तींने हे कृत्य केले : एसजीपीसीचे अधिकारी गुरचरण सिंह ग्रेवाल म्हणाले की, 'काही खोडकर लोक दरबार साहिबमध्ये आले आणि त्यांनी असे कृत्य केले जे शिष्टाचाराला अनुसरून नाही. अलीकडे एका व्यक्तीने येथे येऊन तलावात स्नान केले. आंघोळ केल्यानंतर त्याने एक टी - शर्ट घातला होता, ज्यावर हजारो लोकांचा खून करणाऱ्या जगदीश टायटलरचा फोटो होता.