कोलकाता (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगालच्या अलीपुरद्वार जिल्ह्यातील एका शॉपिंग मॉलमध्ये चॉकलेट चोरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (video stealing chocolates goes viral) झाल्यानंतर एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीने आत्महत्या (Girl student commits due to stealing chocolates) केली. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली.
मुलीची आत्महत्या : पोलिसांनी सांगितले की, रविवारी जयगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुभाष पॅली येथे एका तृतीय वर्षाच्या पदवीधर विद्यार्थिनीचा मृतदेह तिच्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या पालकांनी रविवारी जयगाव येथील छठ पूजा घाटावर स्टॉल लावला होता. ते दोन मुलींसह स्टॉलमध्ये व्यस्त होते. त्यावेळी मुलीने आत्महत्या केली. मुलीच्या आई-वडिलांना शेजाऱ्यांमार्फत ही माहिती (Girl student commits suicide) मिळाली.
शॉपिंग मॉल विरोधात आंदोलन : त्यानंतर परिसरातील नागरिकांनी शॉपिंग मॉलच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात जायगाव पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले. मयताच्या कुटुंबीयांनी जयगाव पोलीस ठाण्यात त्या शॉपिंग मॉलच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध खुनाची लेखी तक्रार दाखल केल्याचे सांगण्यात आले. व्हिडिओ बनवून तो ऑनलाइन पोस्ट करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली (Girl student stealing chocolates) आहे.
अपमानामुळे हे पाऊल उचलले : मुलीच्या वडिलांनी सांगितले की - ती 29 सप्टेंबर रोजी आपल्या बहिणीसोबत परिसरातील एका शॉपिंग मॉलमध्ये गेली होती. तेथून निघताना चॉकलेट चोरताना पकडले गेले. त्यांनी चॉकलेटची किंमत मोजून दुकानदारांची माफी मागितल्याचे सांगितले. अपमानामुळे हे पाऊल उचलल्याचे वडिलांनी (student commits suicide) सांगितले.
कायदेशीर कारवाई : या संदर्भात अलीपुरद्वार जिल्हा पोलीस अधीक्षक वाय रघुवंशी यांनी सांगितले की, जयगाव पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. रघुवंशी म्हणाले - घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. मुलीचा फोटो सोशल मीडियावर कोणी व्हायरल केला ? याचा तपास सुरू आहे. आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहोत. या घटनेत दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.