भुवनेश्वर Girl Carries Injured Father : जखमी वडिलांना रुग्णालयात नेण्यासाठी पैसे नसल्यानं अल्पवयीन मुलीनं सायकलच्या ट्रॉलीवर त्यांना 35 किमी अंतरावरच्या रुग्णालयात नेलं. ही घटना ओडीशामधील भद्रक इथं रविवारी उघडकीस आली. संभूनाथ सेठी असं त्या मारहाणीत जखमी झालेल्या वडिलाचं नाव आहे. त्यांच्या मुलीनं जखमी वडिलांना 35 किमी सायकलच्या ट्रॉलीवर नेलं आहे.
- काय आहे प्रकरण : धुसुरी नदीगाव इथल्या संभूनाथ सेठी यांचा एका गटासोबत वाद झाला होता. या वादात संभूनाथ शेठी यांना मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे जखमी झालेल्या संभूनाथ सेठी यांना रुग्णालयात नेण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांकडं पैसे नसल्यानं मोठी अडचण झाली. यामुळे त्यांच्या अल्पवयीन मुलीनं 35 किमी अंतर असलेल्या धामनगरच्या सरकारी रुग्णालयात नेलं.
शस्त्रक्रिया करण्यासाठी पैसे नसल्यानं आणलं परत : संभूनाथ सेठी यांना त्यांच्या मुलीनं सायकलच्या ट्रॉलीवर 35 किमी अंतर असलेल्या रुग्णालयात नेलं होतं. मात्र रुग्णालयात नेल्यानंतर वडिलांना मारहाण झाल्यानं गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनानं त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांना सांगितलं. त्यामुळे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी गुरुवारी त्यांना परत नेण्यास सांगितलं. मात्र खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी पैसे नसल्यानं त्यांना रुग्णालयातून घरी परत आणण्यात आलं.
पत्रकारांनी विचारपूस केल्यानं फुटली प्रकरणाला वाचा : अल्पवयीन मुलगी जखमी वडिलांना घेऊन सायकल चालवत असल्यानं रस्त्यानं जाताना काही पत्रकारांनी तिला विचारलं. त्यावेळी संभूनाथ सेठी यांच्या मुलीनं आपली आपबिती त्यांच्यापुढं कथन केली. ही घटना रविवारी घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रकरण उजेडात येताच भद्रकचे आमदार आणि धामनगरचे माजी आमदार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संभूनाथ सेठी यांच्या उपचाराची व्यवस्था केल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली.
हेही वाचा :