ETV Bharat / bharat

H3N2 Virus : विषाणूपासून बचाव करायचा असेल, तर जनतेने आणि सरकारने 'हे' काम तातडीने केले पाहिजे.

H3N2 विषाणूमुळे होणार्‍या इन्फ्लूएंझाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे बघुन, सार्वजनिक वाहतूक, रुग्णालये, रेल्वे स्थानके आणि इतर सार्वजनिक ठिकाणे-वाहने अशा अतिसंवेदनशील भागात सरकार पुन्हा मास्क अनिवार्य करू शकते.

H3N2 Virus
विषाणूपासून बचाव कसा करायचा
author img

By

Published : Mar 14, 2023, 5:20 PM IST

नवी दिल्ली : H3N2 विषाणूमुळे होणार्‍या इन्फ्लूएंझाच्या प्रकरणांमध्ये भारतात वाढ होत आहे, परंतु आरोग्य तज्ञांनी सोमवारी लोकांना मास्क वापरणे, हाताची स्वच्छता, तसेच एकदा फ्लूचा डोज घेणे यासारख्या सावधगिरीचे उपाय करण्याचे सुचवले आहे. IDSP - IHP (इंटिग्रेटेड हेल्थ इन्फॉर्मेशन प्लॅटफॉर्म) वर उपलब्ध असलेल्या नवीनतम डेटानुसार, 9 मार्चपर्यंत राज्यांकडून H3N2 सह इन्फ्लूएंझाच्या विविध उपप्रकारांच्या एकूण 3,038 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. यामध्ये जानेवारीमध्ये 1,245, फेब्रुवारीमध्ये 1,307 आणि 9 मार्चपर्यंत 486 प्रकरणांचा समावेश आहे.

सार्वजनिक ठिकाणी मास्क लावने अनिवार्य : गुरुग्रामच्या मॅक्स हॉस्पिटलचे इंटर्नल मेडिसिन- असोसिएट कन्सल्टंट- डॉ सुनील सेकरी यांनी IANS यांना सांगितले की, 'माझ्या मते सरकारने सार्वजनिक वाहतूक, रुग्णालये, विमानतळ, रेल्वे स्थानके आणि इतर सार्वजनिक वाहने यासारख्या अतिसंवेदनशील भागात पुन्हा मास्क अनिवार्य केले पाहिजेत. लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मग ते घरात असो किंवा बाहेर, त्यांनी मास्क लावावा.

डॉ. सुनील सेकरी काय सांगतात : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नॅशनल कोविड 19 टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन म्हणाले की, 'श्वासोच्छवासातील विषाणू थेंबांद्वारे पसरतो, म्हणजे स्राव एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे पसरतो. परंतु जेव्हा लोक नाकाला आणि तोंडाला स्पर्श करतात, किंवा हा स्राव त्यांच्या बोटांवर राहू शकतो आणि जेव्हा ते इतर लोकांशी हस्तांदोलन करतात, तेव्हा ते विषाणु पसरु शकतात. विशेषत: जेव्हा तुम्ही गर्दीच्या ठिकाणी किंवा एखाद्या सभेत जाता. तेव्हा मास्क लावा. कारण संसर्ग पसरण्याची शक्यता असते. आणि बहुतेक लोकांना एकाच वेळी संसर्ग होतो'.

फ्लूची सामान्य लक्षणे : इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या आकडेवारीनुसार, कोविड-19 विषाणू, स्वाइन फ्लू (H1N1), H3N2 विषाणू आणि मौसमी जीवाणू आणि यमागाता वंशाचा व्हायरस, इन्फ्लूएन्झा बी यांसारख्या रक्ताभिसरणात श्वसनाच्या विषाणूंचे मिश्रण आढळून आले आहे. H3N2 आणि H3N2 हे दोन्ही प्रकारचे इन्फ्लुएंझा ई विषाणू आहेत, जे सामान्यतः फ्लू म्हणून ओळखले जातात. काही सामान्य लक्षणांमध्ये दीर्घकाळ ताप, खोकला, नाक वाहणे आणि अंगदुखी यांचा समावेश होतो. परंतु गंभीर प्रकरणांमध्ये लोकांना श्वास लागणे किंवा चक्कर देखील येऊ शकते.

घराबाहेर योग्य मास्क वापरा : दरम्यान, कोविड संसर्गातही चार महिन्यांनंतर अचानक वाढ नोंदवण्यात आली आहे, कारण रविवारी कोविडचे 524 रुग्ण आढळले. संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. ईश्वर गिलाडा म्हणाले की, 'गेल्या तीन वर्षांत आम्ही श्वासोच्छवासाच्या संसर्गापासून बचाव कसा करायचा हे शिकलो आहोत. कारण बाहेर गेल्यास संसर्ग नाक आणि तोंडातून आत येतो, तुम्हाला नाक आणि तोंड मास्कने झाकून ठेवण्याची गरज आहे. योग्य मास्क आवश्यक आहे, विशेषतः गर्दीच्या ठिकाणी.

हेही वाचा : Adenovirus Alert : देशभरात वाढतो आहे एडेनोव्हायरसचा धोका, या राज्यात रुग्णांची संख्या सर्वाधिक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.