बाडमेर : चुकून सीमा पार करुन पाकीस्तानात गेलेल्या भारतीय तरुणाची तब्बल 28 महिन्यानंतर सुटका झाली आहे. गेमराराम मेघवाल असे या भारतीय तरुणाचे नाव आहे. तो पाकीस्तानातील हैदराबादमधील कारागृहात बंद होता. त्याला आज वाघा बार्डरवरील भारत पाकीस्तान सीमेवरुन भारताच्या सुपूर्द करण्यात आले आहे. 5 नोव्हेंबर 2020 ला गेमराराम हा पाकीस्तानची सीमा ओलांडून गेला होता. 24 जानेवारी 2021 पासून तो हैदराबादच्या कारागृहात बंदी होता. त्याच्या सुटकेसाठी केंद्रीय मंत्री कैलाश चौधरी कर्नल मानवेंद्रसिंह यांनी प्रयत्न केले होते.
केंद्रीय मंत्री कैलास चौधरी यांनी दिली होती माहिती : पाकीस्तानची सीमा पार करुन गेलेल्या गेमरारामची सुटका होऊन तो सुरक्षित परत आला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी त्याला वाघा बॉर्डरवर भारतीय अधिकाऱ्यांकडे आज सोपवले आहे. केंद्रीय मंत्री आणि बारमेर जैसलमेरचे खासदार कैलाश चौधरी यांनी त्याबाबतची माहिती दिली होती. त्यांनीच गेमराराम आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून 2 वर्षांपूर्वी चुकून पाकिस्तानात गेल्याबाबतची माहिती दिली होती. आता गेमराराम परत भारतात आला असल्याने त्याच्या कुटूंबियांचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे. कैलाश चौधरी यांनी ही आमच्या मतदार संघासह भारतासाठीही आनंदाची बाब असल्याचे यावेळी सांगितले आहे.
गेमरारामच्या वडिलांचे झाले निधन : गेमराराम हा दोन वर्षापूर्वी सीमा ओलांडून चुकून पाकीस्तानात गेला होता. त्यामुळे त्याच्या कुटूंबीयांना मोठा धक्का बसला होता. त्यातच त्याच्या वडिलांच्या निधनानेही गेमरारामचे कुटूंबीय हतबल झाले होते. मात्र दुसरीकडे या प्रकरणी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानमधील भारतीय दूतावास यांच्यात सतत गेमरारामच्या सुटकेबाबत चर्चा सुरू होती. गेमराराम पाकीस्तानात गेल्यामुळे देशभर याबाबत मोठी चर्चा रंगली होती. गेमराराम हा पाकीस्तानातील हैदराबादमधील कारागृहात बंदी होता.
बाडमेरमध्ये आनंदोत्सव : बाडमेर जिल्ह्यातील तरुण पाकीस्तानची सीमा ओलांडून गेल्यामुळे तो हैदराबादच्या कारागृहात बंदी होता. यामुळे बाडमेरसह देशभरात संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यासाठी भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि पाकीस्तान दुतावासात चर्चा सुरू होती. या प्रकरणाचा पाठपुरावा केंद्रीय मंत्री कैलाश चौधरी घेत होते. गेमरारामची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यातच घरातील कर्ता पुरुष म्हणून गेमरारामचे भारतात परतणे गरजेचे होते. त्यातच त्याच्या वडिलांचेही निधन झाल्याने गेमरारामचे भारतात परतणे गरजेचे असल्याचे कैलास चौधरी यांनी सांगितले. आज गेमराराम भारत पाकीस्तान सीमेवरील अटारी बॉर्डरवर भारताच्या सुपुर्द करण्यात आला आहे. त्यामुळे कैलास चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे आभार मानले आहेत.
हेही वाचा - Online Fraud In Hyderabad : सोशल माध्यमावरील साडीच्या मोहापायी गमावले लाखो रुपये, हैदराबादच्या महिलेची फसवणूक, अशी घ्या काळजी