धुपगुरी (पश्चिम बंगाल) : Gas Cylinder For ५०० Rs : केंद्र सरकारनं अलीकडेच एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कपात केली. असे असतानाही तृणमूल काँग्रेसचे अखिल भारतीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी शनिवारी एलपीजीच्या किमतीवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात 'इंडिया' आघाडीची सत्ता आल्यास एलपीजी सिलेंडर ५०० रुपयांना मिळेल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
एलपीजीच्या किमतीवरून भाजपावर निशाणा साधला : तृणमूलमधील क्रमांक दोनचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी शनिवारी पश्चिम जलपाईगुडीच्या धुपगुरीमध्ये जाहीर सभेला संबोधित केलं. येथे येत्या मंगळवारी विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. या सभेत बोलताना त्यांनी एलपीजीच्या किमतीवरून भाजपावर निशाणा साधला. विशेष म्हणजे, रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारनं स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात २०० रुपयांची कपात केली होती.
गॅसची किंमत १२०० रुपयांवरून २०० रुपये केली : केंद्र सरकारनं रक्षाबंधनाची भेट म्हणून एलपीजी गॅसची किंमत कमी केल्याचं म्हटलं होतं. अभिषेक बॅनर्जी यांनी शनिवारी त्याची खिल्ली उडवली. 'रक्षाबंधनाची भेट म्हणजे स्वयंपाकाच्या गॅसची किंमत कमी करणे. रक्षाबंधन दर पाच वर्षांनी एकदा येते!' असं अभिषेक बॅनर्जी म्हणाले. 'गॅसची किंमत १२०० रुपयांवरून २०० रुपये करण्यात आली आहे', असही बॅनर्जी म्हणाले.
..तर गॅसची किंमत ५०० रुपये होईल : २०२४ मध्ये भाजपाचा विजय झाला तर स्वयंपाकाच्या गॅसची किंमत ३००० रुपये होईल. मात्र जर 'इंडिया' आघाडीचं सरकार आलं तर गॅसची किंमत ५०० रुपये होईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं. भारतातील नागरिक भाजपापासून दूर गेले असून पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकीत भगवा पक्ष (भाजपा) हरणार आहे, असा दावाही अभिषेक बॅनर्जींनी केला.
धुपगुरीमध्ये पोटनिवडणूक : धुपगुरीमध्ये २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे बिष्णुपद रॉय विजयी झाले होते. नुकतंच त्यांचं निधन झालं. त्यामुळे येथे पोटनिवडणूक घ्यावी लागली. शहीद जवानाची पत्नी तापसी रॉय यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे. तर तृणमूलच्या तिकिटावर निर्मल चंद्र रॉय निवडणूक लढवत आहेत.
हेही वाचा :