ETV Bharat / bharat

ओडिशातील शाळांचा कायापालट करणारा मराठमोळा जिल्हाधिकारी! - गंजाम जिल्हाधिकारी विजय कुलांगे

विजय कुलांगे हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण म्हसोबा गावचे रहिवासी आहेत. ते सध्या ओडिशा राज्यातील गंजाम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत आहेत. शाळांचा कायापालट करण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे.

vijay kulange
जिल्हाधिकारी विजय कुलांगे
author img

By

Published : Oct 29, 2021, 9:09 PM IST

Updated : Dec 9, 2021, 10:18 PM IST

अक्षय पोकळे - सध्या खासगी शाळांमध्ये मुलांना शिक्षण देण्यासाठी पालकांची धडपड सुरू असते. लाखो रुपये फी देऊन पालक खासगी शाळांना प्राधान्य देतात. शासकीय शाळांमध्ये सुविधा आणि शिक्षणाचा दर्जा चांगला नसल्याचा गैरसमज म्हणा पण पालकांमध्ये दिसून येतो. मात्र, ओडिशा राज्यातला गंजाम जिल्हा याला अपवाद आहे. या जिल्ह्यात School Transformation अर्थात शाळांचा कायापालट करण्याचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. विशेष म्हणजे, येथील मराठमोळे जिल्हाधिकारी विजय कुलांगे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प सुरू आहे. तसेच ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राज्यात राबवण्यात येत आहे. या विषयावर 'ई टीव्ही भारत'चे प्रतिनिधी अक्षय पोकळे (Akshay Pokale) यांनी जिल्हाधिकारी विजय कुलांगे (Vijay Kulange) यांच्यासोबत संवाद साधला.

माहिती देताना जिल्हाधिकारी विजय कुलांगे
  • शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन -

Teamwork, Transparency, Technology, Transformation आणि Time या '5T' तत्वांवर हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण देणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. पायाभूत सुविधा उप्लब्ध करून देत शाळांचा कायापालट या प्रकल्पांतर्गत केला जातो. पहिल्या टप्प्यात गंजाम जिल्ह्यातील 50 शाळांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. याचे थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडून परीक्षण केले जाते. गंजाममधील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मेहनत घेऊन या प्रकल्पाला रुप दिले आहे. यामध्ये सरपंच, पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, स्कूल मॅनेजमेट समितीचे सर्व सदस्य या सर्वांनी सक्रीय योगदान दिले असल्याचे जिल्हाधिकारी विजय कुलांगे यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन हे उद्देश ठेऊन मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये पोहचवण्याचे ध्येय असल्याचे विजय कुलांगे यांनी बोलून दाखवले.

School Transformation
शाळांचा कायापालट

या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात 50 शाळांचा यशस्वी कायापालट करण्यात आला आहे. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील 83 शाळांचा कायापालट करण्याचे काम सुरू आहे. तसेच पुढील काही महिन्यात तिसऱ्या टप्पामध्ये 233 शाळांचा कायापालट करण्यात येणार आहे. शिक्षणातून परिवर्तन आणि मुलांमध्ये सक्षमीकरण हा उद्देश ठेऊन हा पूर्ण उपक्रम सुरू असल्याचे गंजाम जिल्ह्याचे जिल्हाथिकारी विजय कुलांगे यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

School Transformation
शाळांचा कायापालट

या प्रकल्पात सहा महत्त्वाच्या बाबींचा समावेश होतो. स्मार्ट वर्ग, ई-लायब्ररी, आधुनिक प्रयोगशाळा, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि खेळाचे मैदान. हा प्रकल्प मार्च 2021 मध्ये सुरू करण्यात आला आहे.

  • आमदार-खासदारांनी दिल्या भेटी -

School Transformation प्रकल्पाला राज्यातील जवळपास 108 आमदार आणि अनेक खासदारांनी भेटी दिल्या आहेत. हा प्रक्लप कसा राबवला जातो याबाबतची माहिती त्यांनी जाणून घेतली. येत्या काळात पूर्ण राज्यात हा प्रकल्प राबवला जाणार असल्याचे यावेळी या लोकप्रतिनिधींनी सांगितले आहे.

School Transformation
शाळांचा कायापालट
  • मराठमोळे जिल्हाधिकारी विजय कुलांगे यांचा परिचय -

विजय कुलांगे हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण म्हसोबा गावचे रहिवासी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण जीवन शिक्षण विद्या मंदिर आणि माध्यमिक शिक्षण श्रीराम विद्यालयात पूर्ण झाले आहे. अकरावी-बारावी त्यांनी नगरच्या एका कॉलेजमधून पूर्ण केले. त्यानंतर डी. एड. आणि पुढे शिक्षणासोबत नोकरी सांभाळत बी. ए. आणि एम. ए. केले. त्यानंतर ते पुढे जाऊन विक्रीकर अधिकारी, तहसीलदार बनले. त्यानंतर यूपीएससी देत ते आता ओडिशामधील गंजाम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत. ‘आजचा दिवस माझा’ हे त्यांचे पुस्तकदेखील प्रसिद्ध झाले आहे.

School Transformation
शाळांचा कायापालट

विजय कुलांगे हे २००१ साली सहायक विक्रीकर निरीक्षक पदी नियुक्त झाले होते. त्यानंतर २०१० मध्ये त्यांनी जामखेडचे तहसीलदार म्हणून काम केले. त्यावेळी वाळू माफिया, स्त्री भ्रूणहत्या, रस्ते, पाण्याचे प्रश्न यावर त्यांनी उत्कृष्ट काम केले. पुढे २०११ साली UPSC परीक्षा ते पास झाले. सध्या ते ओडिशाच्या गंजाम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत आहेत. चक्रीवादळाचा फटका असो किंवा कोरोना विषाणूचा संसर्ग असो, विजय कुलांगे यांनी आपल्या कामातून सर्वसामान्य नागरिकांना आपलंस केले आहे.

हेही वाचा - मराठमोळ्या जिल्हाधिकाऱ्यांचा 'गंजाम पॅटर्न'; विजय कुलांगे यांची विशेष मुलाखत

Last Updated : Dec 9, 2021, 10:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.