ETV Bharat / bharat

Murder of Tillu Tajpuria: गँगस्टर गोल्डी ब्रारची कबुली! म्हणाला, आम्ही गोगीच्या हत्येचा बदला घेतला - Gangster tillu tajpuriya

गुंड टिल्लू ताजपुरियाच्या हत्येनंतरच्या नाट्याला अधिकाधिक वेगळे वळन येत आहेत. दरम्यान टिल्लू ताजपुरियाच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर गोल्डी ब्रारने घेतल्याचे आता या प्रकरणात उघड झाले आहे.

Gangster Goldy Brar
Gangster Goldy Brar
author img

By

Published : May 2, 2023, 4:20 PM IST

नवी दिल्ली : कुख्यात गँगस्टर गोल्डी ब्रारने टिल्लू ताजपुरियाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. असा दावा सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. 'भाऊ जितेंद्र गोगीच्या हत्येचा बदला घेतला आहे', असे फेसबुक पोस्टवर म्हटले आहे. गोल्डी ब्रार हा लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहकारी आहे. हा तोच लॉरेन्स बिश्नोई आहे ज्यावर पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा आरोप आहे.

टिल्लू ताजपुरियाची हत्या योगेश टुंडा आणि दीपक तीतर यांनी केली : तिहार तुरुंगात गुंड टिल्लू ताजपुरियाच्या हत्येनंतर गोल्डी ब्रारने सोशल मीडियावर टाकलेली ही पोस्ट पोलीस आणि तुरुंग प्रशासनासाठी चिंतेचा विषय बनली आहे. जुन्या हत्येचा बदला घेण्यासाठी हे कृत्य केल्याचा दावा करण्यात आला आहे. तिहार तुरुंगातील टोळीयुद्ध आता थांबेल की नाही हे सांगणे सध्या कठीण आहे अशीही चर्चा आहे. दरम्यान, गोल्डी ब्रारच्या फेसबुक पोस्टवरून असा दावा करण्यात आला आहे की, 'टिल्लू ताजपुरियाची हत्या योगेश टुंडा आणि दीपक तीतर यांनी केली. टिल्लूने आमचा भाऊ जितेंद्र गोगीचा खून केला. आम्ही आता त्या हत्येचा बदला घेतला असही ते या पोस्टमध्ये मांडण्यात आले आहे.

तुम्हाला वाटेल की आम्ही सुटलो तस नाही लवकरच आपली भेट होईल : यावेळी, मित्रांनो, फेसबुकवर पोस्ट टाकून बदमाश बनणाऱ्या सर्वांना मी सांगू इच्छितो की, फेसबुक पोस्टमुळे कोणीही बदमाश होत नाही त्याला कोणी मारत असेल तर त्याचा बदलाही घ्यावा लागतो. यासोबतच आणखी एक धमकीही देण्यात आली आहे की, 'आमच्या शत्रूंना मदत करणाऱ्या प्रत्येकाला मला एक गोष्ट सांगायची आहे. तुम्हाला वाटेल की आम्ही सुटलो तस नाही लवकरच आपली भेट होईल अशी धमकी यामध्ये देण्यात आली आहे. तसेच, यावेळी पोस्टच्या शेवटी लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार, जोगिंदर गोगी यांच्या नावांसह अनेक गुंडांची नावेही खाली लिहण्यात आले आहेत.

हेही वाचा : Karnataka Election Campaign : पंतप्रधान मोदी, प्रियांका गांधी, राहुल गांधी यांचा आज कर्नाटकात झंझावाती प्रचार दौरा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.