अहमदाबाद (गुजरात): माफिया अतिक अहमदच्या विरोधात पोलिसांची पकड आणखी घट्ट होत आहे. अतिक अहमद हा सध्या साबरमती कारागृहात आहे. उत्तर प्रदेश पोलीस त्याला प्रयागराजला घेऊन येणार आहेत. 29 मार्च रोजी त्याला एका खटल्यात हजर करण्यात येणार आहे. यासोबतच उमेश पाल हत्येप्रकरणीही यूपी पोलीस त्याची चौकशी करू शकतात. ट्रान्सफर वॉरंटसह सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अतिकला प्रयागराजला नेण्यात येईल.
२००७ सालचे आहे प्रकरण: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यूपी पोलीस त्याला रस्त्याने उत्तरप्रदेशात आणू शकतात. त्यासाठी पोलिसांनी दोन मोठ्या गाड्या आणि बोलेरोची व्यवस्था केली आहे. पोलीस त्याला कोणत्या मार्गाने आणतील, याचा खुलासा झालेला नाही. मात्र, त्याला झाशीमार्गे उत्तरप्रदेशात आणले जाऊ शकते, असे मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे. त्याला २००७ सालच्या २९ मार्च रोजी अपहरण, दंगल आणि खंडणी प्रकरणी हजर केले जाणार आहे.
आतापर्यंत दोन आरोपींचे एन्काउंटर: उमेश पाल हत्येप्रकरणी पोलीस अतिक अहमदचा शोध घेत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अतिक अहमद आणि त्याच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींचे एन्काउंटर केले आहे. आता अतिक अहमदच्या पत्नीने आपल्या पतीचेही एन्काउंटर केले जाऊ शकते, अशी भीती व्यक्त केली आहे. आतिकची पत्नी शाहिस्ता परवीन स्वतः फरार असून, पोलिसांनी त्याच्यावर बक्षीसही ठेवले आहे. अतिकला रस्त्याने यूपीला आणले जाणार असल्याची चर्चा सुरू होताच विविध चर्चा सुरू झाल्या. यापूर्वी यूपी पोलिसांनी गुंड विकास दुबेला मध्य प्रदेशातून आणले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार उलटल्यानंतर तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता आणि यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.
असे सुरु झाले वैमनस्य: २००४ मध्ये अतिक अहमद याने उत्तरप्रदेशच्या फुलपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. अतिक याने अलाहाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून राजीनामा दिल्यानंतर जागेवर पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत बसपच्या राजु पाल यांनी अतिकचा धाकटा भाऊ अश्रफ यांचा पराभव केला. तेव्हापासून राजु पाल आणि अतिक यांच्यात वैर सुरू झाले. पोलिसांच्या आरोपानुसार आतिक अहमदने राजु पालची हत्या केली. यावेळी अतिकच्या समर्थकांनी त्यालाही मारल्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. उमेश पाल आणि त्याच्या अंगरक्षकांवर या गुंडांनी कशाप्रकारे गोळीबार केला, हे यात दिसत आहे. ज्यावेळी राजु पाल मारला गेला त्याचवेळी देवीपाल आणि संदीप यादव नावाचे आणखी दोन लोकही याच गोळीबारात मारले गेले.
हेही वाचा: करौली बाबाचे विशाल साम्राज्य, आलिशान गाड्या, १४ एकरांचा आश्रम