ETV Bharat / bharat

Gangrape with dalit sisters in Ayodhya:अयोध्येत दोन सख्ख्या दलित बहिणींवर गँगरेप - दोन सख्ख्या बहिणींवर सामूहिक बलात्कार

अयोध्येत दोन सख्ख्या बहिणींवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे.

अयोध्येत दोन सख्ख्या दलित बहिणींवर गँगरेप

author img

By

Published : Aug 10, 2022, 2:50 PM IST

अयोध्या (उत्तर प्रदेश) : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एका गावात उसाच्या शेतात दोन सख्ख्या बहिणींवर सामूहिक बलात्कार झाल्याची लज्जास्पद घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी येथे लेखी फिर्याद दिली. त्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोन सख्ख्या बहिणींवर सामूहिक बलात्कार तेही अयोध्येत झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

अयोध्येत दोन सख्ख्या दलित बहिणींवर गँगरेप

याप्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल करताना पोलिसांनी दोन्ही बहिणींना मेडिकलसाठी पाठवले. आरोपींचा शोध सुरू आहे. दोन्ही मुली बाजारातून खरेदी करून घरी परतत असताना ही घटना घडली. गँगरेपनंतर जीवे मारण्याची धमकीही त्यांना देण्यात आली. दोन्ही पीडित बहिणी या अनुसूचित जातीच्या आहेत. सोमवारी सायंकाळी शेरपूर पारा बाजार येथे त्या गेल्या होत्या. तेथून घरी परतत असताना 4 तरुणांनी दोघींना गावाजवळ पकडून उसाच्या शेतात नेऊन सामूहिक बलात्कार केला.

या घटनेनंतर तरुणांनी तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे दोन्ही मुलींनी सांगितले. बराचवेळ घरी न पोहोचल्याने नातेवाइकांनी त्यांचा शोध सुरू केला. तेव्हा सगळा प्रकार उघडकीस आला. दोन्ही मुलींचे मेडिकल करण्यात आले असून, आरोपीचा शोध सुरू आहे.

हेही वाचा - Kali Sena on Krishna Janmashtami: हरिद्वारमध्ये कृष्ण जन्माष्टमीला केक कापणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.