जयपूर - जिल्ह्यातील महवा येथे दहावीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना ( Dausa gangrape news ) समोर आली आहे. राजगढमधील काँग्रेस आमदार जोहरीलाल मीणा यांचा ( Rajgarh MLA Johri Lal Meena son ) मुलगा दीपक मीणा याच्यासह ३ जणांवर जिल्ह्यातील मंडवार पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पोक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सामूहिक बलात्कारानंतर आरोपीने पीडितेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची ( Rajasthan news in Marathi ) धमकीही दिली.
पोलिसांनी सांगितले की, मंडवार पोलिस ठाण्यात सामूहिक बलात्कार आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल ( girl gang raped in Dausa ) करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी 15 लाख रुपये आणि घरात ठेवलेले दागिनेही ( Gangrape with tenth student in Dausa ) घेतले. पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे रैनी परिसरातून अपहरण केले. मंडवार पोलीस स्टेशन हद्दीतील महुआ-मंडावर रोडवरील समलेती पॅलेस हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
हेही वाचा-Kirit Somaiya In Dapoli : किरीट सोमय्या पोलीस ठाण्यात दाखल.. दापोलीत तणावाचे वातावरण
आमदार मुलासह तिघांवर गुन्हा दाखल-
मंडवार पोलीस ठाण्यात विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजगडचे आमदार जोहरीलाल मीणा यांचा मुलगा दीपक मीणा याच्यासह तीन मित्रांविरुद्ध दौसा जिल्ह्यातील महवा उपविभागातील मंडवार पोलिस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी रैनी परिसरातून दहावीच्या विद्यार्थिनीचे अपहरण करून तिला मंडवार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महवा-मंडावर रोडवर असलेल्या समलेती पॅलेस हॉटेलमध्ये आणले. 24 फेब्रुवारी 2021 रोजी आरोपींनी या हॉटेलमध्ये सामूहिक बलात्कार केला.
हेही वाचा-Kirit Somaiya protest : किरीट सोमैय्या यांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन
व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली होती धमकी-
आरोपीने पीडितेला अनेकवेळा दबावाखाली बोलावून हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केला. इतकेच नाही तर तिन्ही आरोपींनी पीडितेचा अश्लील व्हिडिओही बनवला होता. हा व्हिडिडओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. सध्या आमदार पुत्र दीपक मीना, विवेक शर्मा रा. थुमडा आणि नेतराम समलेती यांच्यावर मंडवार पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास महवाचे डीएसपी करत आहेत.
हेही वाचा-Devendra Fadnavis : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही : देवेंद्र फडणवीस
पीडितेकडून 15 लाख रुपये आणि दागिनेही घेतले
या प्रकरणाबाबत मंडवार पोलीस ठाण्याचे प्रभारी नथुलाल यांनी सांगितले की, पीडितेच्या भावाने गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने याआधी पीडितेबरोबर फेसबुकवर मैत्री केली होती. यानंतर तिचे घरातून अपहरण करून मंडवार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये नेण्यात आले. तेथे आमदार पुत्र दीपक मीणासह तीन मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यासोबतच आरोपी पीडितेचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करत असे. आरोपीने पीडितेकडून 15 लाख रुपये आणि दागिनेही घेतले होते.
पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन सुरू
या प्रकरणाच्या निषेधार्थ पीडितेच्या भावाने माजी प्रमुख राजेंद्र मीणा यांच्या नेतृत्वाखाली शेकडो लोकांसह मंडवार पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहेहे. यावेळी आरोपींना अटक करण्याची मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली. आमदार मुलासह सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी त्यांची मागणी आहे. जोपर्यंत सर्व दोषींना अटक होत नाही तोपर्यंत संप सुरुच ठेवणार असल्याचे पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितले.