वाराणसी (उत्तरप्रदेश): पंतप्रधान नरेंद्र मोदी आज MV गंगा विलास या जगातील सर्वात लांब नदी क्रूझचे उदघाटन करणार आहेत. यामुळे भारतासाठी नदी क्रूझ पर्यटनाच्या नव्या युगाची सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे लक्झरी क्रूझ भारत आणि बांगलादेशातील पाच राज्यांमधील 27 नद्यांमधून प्रवास करून 3,200 किमी पेक्षा जास्त अंतर पार करणार आहे. चला तर जाणून घेऊयात या जहाजांविषयी..
-
आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी 13 जनवरी को दुनिया के सबसे लंबे रिवर क्रूज 'गंगा विलास' को हरी झंडी दिखाकर रवाना करेंगे।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) January 11, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
'नए भारत' की गति, शक्ति और सामर्थ्य की प्रतीक यह रिवर क्रूज-यात्रा 'एक भारत-श्रेष्ठ भारत' में एकात्मता के नए अध्याय जोड़ेगी।#LongestRiverCruise pic.twitter.com/S13u8fqo0J
">आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी 13 जनवरी को दुनिया के सबसे लंबे रिवर क्रूज 'गंगा विलास' को हरी झंडी दिखाकर रवाना करेंगे।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) January 11, 2023
'नए भारत' की गति, शक्ति और सामर्थ्य की प्रतीक यह रिवर क्रूज-यात्रा 'एक भारत-श्रेष्ठ भारत' में एकात्मता के नए अध्याय जोड़ेगी।#LongestRiverCruise pic.twitter.com/S13u8fqo0Jआदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी 13 जनवरी को दुनिया के सबसे लंबे रिवर क्रूज 'गंगा विलास' को हरी झंडी दिखाकर रवाना करेंगे।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) January 11, 2023
'नए भारत' की गति, शक्ति और सामर्थ्य की प्रतीक यह रिवर क्रूज-यात्रा 'एक भारत-श्रेष्ठ भारत' में एकात्मता के नए अध्याय जोड़ेगी।#LongestRiverCruise pic.twitter.com/S13u8fqo0J
देश-विदेशातील ५० पर्यटन स्थळांना देणार भेट: 51 दिवसांच्या क्रूझमध्ये जागतिक वारसा स्थळे, राष्ट्रीय उद्याने, नदी घाट आणि बिहारमधील पाटणा, झारखंडमधील साहिबगंज, पश्चिम बंगालमधील कोलकाता, बांगलादेशातील ढाका आणि आसाममधील गुवाहाटी यांसारख्या प्रमुख शहरांसह 50 पर्यटन स्थळांना भेट देण्याची योजना आहे. MV गंगा विलास जहाज 62 मीटर लांब, 12 मीटर रुंद आहे. यात तीन डेक, 36 पर्यटकांच्या क्षमतेसह 18 सुइट्स आहेत, ज्यात पर्यटकांना एक संस्मरणीय आणि विलासी अनुभव देण्यासाठी सर्व सुविधा आहेत.
![Ganga Vilas Cruise Booking Ticket Price Route Map Journey Duration Features and More About Worlds Longest River Cruise](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/ganga1_1201newsroom_1673532836_836.jpg)
![Ganga Vilas Cruise Booking Ticket Price Route Map Journey Duration Features and More About Worlds Longest River Cruise](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/ganga2_1201newsroom_1673532836_75.jpg)
गंगा विलास जहाजाचा मार्ग: क्रूझचा प्रवास वाराणसी येथून सुरू होईल आणि उत्तर प्रदेशातील गाझीपूरमार्गे बिहार मध्ये पाटणा आणि नंतर कोलकाता येथे पोहोचेल. त्यानंतर बांगलादेशच्या नदीत प्रवेश केल्यानंतर, दिब्रुगढपर्यंत १५ दिवसांनी ती आसामच्या गुवाहाटी शहरात प्रवेश करेल. ६२ मीटर लांबी आणि १२ मीटर रुंदी असलेल्या या लक्झरी क्रूझ जहाजात तीन डेक, १८ सूट असून त्यात ३६ लोक बसू शकतात. तसेच हे जहाज नदी किंवा पर्यावरणाला कोणत्याही प्रकारे प्रदूषित करत नाही.
![Ganga Vilas Cruise Booking Ticket Price Route Map Journey Duration Features and More About Worlds Longest River Cruise](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/ganga3_1201newsroom_1673532836_1110.jpg)
![Ganga Vilas Cruise Booking Ticket Price Route Map Journey Duration Features and More About Worlds Longest River Cruise](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/ganga9_1201newsroom_1673532836_169.jpg)
गंगा विलास क्रूझचे बुकिंग: समुद्रकिनारे, हिरवेगार खारफुटी जंगल, स्थलांतरित पक्षी आणि कासवे, गोड्या पाण्यातील डॉल्फिन्स, पाण्याचे प्रवाह, पक्ष्यांच्या किलबिलाटाने व्यत्यय आणलेला शांत परिसर आणि सदैव आलिंगन देणारा निसर्ग गंगा विलास क्रूजच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. अंतरा लक्झरी रिव्हर क्रूझच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन जगातील कोठूनही कोणीही याचे तिकीट बुक करू शकतो. प्रति रात्र प्रति व्यक्ती सरासरी भाडे सुमारे 25000 रुपये आहे.
हेही वाचा: पंतप्रधान मोदींच्या हस्ते जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझचे उद्घाटन
गंगा विलास क्रूझ ट्रॅव्हल पॅकेज
1- अतुल्य बनारसचे पॅकेजः अतुल्य बनारस पॅकेजची किंमत 1 लाख 12 हजार रुपये आहे. या पॅकेजमध्ये गंगा घाटापासून रामनगरपर्यंतच्या पर्यटनाचा समावेश आहे. हा प्रवास ४ दिवसांचा असेल. त्याच वेळी, बनारसमध्ये एका दिवसाच्या प्रवासाचे भाडे 300 डॉलर्स म्हणजे सुमारे 25 हजार रुपये आहे.
2- कोलकाता ते बनारस पॅकेज: कोलकाता ते बनारस हा प्रवास एकूण 12 दिवसांचा आहे. कोलकाता ते बनारस पॅकेजचे भाडे 4,37,250 रुपये आहे. यामध्ये जहाज कोलकाताहून मुर्शिदाबाद, फरक्का, सुलतानगंज, बोधगया मार्गे वाराणसीला पोहोचेल.
3- कोलकाता ते ढाका पॅकेजः हा प्रवास 12 दिवसांचा असेल. बांगलादेशची राजधानी कोलकाता ते ढाका या प्रवासासाठीही 4,37,250 रुपये मोजावे लागतील. बांगलादेशातील सुंदरबन डेल्टाच्या सहलीसाठी प्रति व्यक्ती 1 लाख 20 हजार रुपये मोजावे लागतील. बेलूर मठ, बंगाल टायगर आणि कोलकात्याच्या मंदिरांसाठी एक लाख ७५ हजार रुपये द्यावे लागतील.