ETV Bharat / bharat

Gang Rape In Bharatpur : भरतपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार - भरतपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

भरतपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना जिल्ह्यातील कामण परिसरात उघडकीस आली आहे. नराधमांनी शस्त्राच्या बळावर तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली ( Gang Rape In Bharatpur ) आहे.

जुर्हरा पोलीस ठाणे
जुर्हरा पोलीस ठाणे
author img

By

Published : Aug 10, 2022, 10:08 PM IST

कामा (भरतपूर) - भरतपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना जिल्ह्यातील कामण परिसरात उघडकीस आली आहे. नराधमांनी शस्त्राच्या बळावर तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. मुलीचा आरडाओरडा ऐकून तिची मोठी बहीण तिला वाचवायला आली, त्यानंतर आरोपींनी मोठ्या बहिणीचे अपहरण केलं. याप्रकरणी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि तिच्या मोठ्या बहिणीचे अपहरण केल्याचा गुन्हा शहरातील जुर्हरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पीडित कुटुंबाने कमनचे डीएसपी प्रदीप यादव यांची भेट घेऊन या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्याची तसेच अपहरण झालेल्या पीडितेच्या बहिणीचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी केली ( Gang Rape In Bharatpur )आहे.

6 ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलगी तिच्या मोठ्या बहिणीसह शेतात जनावरांचा चारा आणण्यासाठी गेली होती. पांढऱ्या रंगाच्या आलिशान कारमध्ये बसून गावातील काही लोक तेथे पोहोचले आणि त्यांनी शस्त्राच्या जोरावर अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. मुलीने आरडाओरडा केल्याने जवळच्या शेतात जनावरांचा चारा गोळा करत असलेल्या बहिणीने तिच्याकडे धाव घेतली. मात्र, आरोपींनी तिलाही जबरदस्तीने गाडीत घालून नेलं आहे.

पीडितेचा आवाज ऐकून गावातील काही लोक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बलात्कार करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीला तिच्या घरी घेऊन गेले. मुलीने या संपूर्ण प्रकरणाची माहिती कुटुंबीयांना दिली, त्यानंतर नातेवाइकांनी जुर्हरा पोलीस ठाणे गाठून सामूहिक बलात्कार आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मंगळवारी पोलिसांनी सामूहिक बलात्कार पीडितेची वैद्यकीय तपासणी केली. त्याचवेळी डीएसपी प्रदीप यादव या प्रकरणाच्या तपास करत आहेत.

हेही वाचा - PM Modi Hits Congress : पंतप्रधानांचा काँग्रेसवर निशाणा म्हणाले, 'काही जण काळ्या जादू कडे वळाले...'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.