ETV Bharat / bharat

Gandhi Jayanti 2022 : महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त त्यांची रेकॉर्ड केलेली भाषणे नक्की ऐका - Gandhi Jayanti 2022

2 ऑक्टोबर (रविवार) महात्मा गांधींची 154 वी जयंती ( Gandhi Jayanti 2022 ) आहे. ही अशी तारीख आहे, ज्याची देशवासी दरवर्षी वाट बघतात आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करतात. देशाच्या विविध राज्यांमध्ये आणि राजधानी दिल्लीत अनेक ठिकाणी भव्य कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदाच्या जयंतीनिमित्त वाचा राजघाटाजवळील राष्ट्रीय गांधी संग्रहालयातील ईटीव्ही इंडियाचा हा विशेष रिपोर्ट

Gandhi Jayanti 2022
महात्मा गांधी जयंती
author img

By

Published : Oct 2, 2022, 11:59 AM IST

नवी दिल्ली : दिल्लीतील राजघाट येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे राष्ट्रीय गांधी संग्रहालय ( National Gandhi Museum ) सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी नेहमीच खुले असते. सोमवार वगळता दररोज मोठ्या संख्येने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी गांधीजींशी संबंधित मूळ कागदपत्रे आणि वैयक्तिक वस्तू पाहण्यासाठी येथे येतात. इथे एक गोष्ट खूप खास आहे, ती म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आवाज (राष्ट्रीय गांधी संग्रहालयात गांधींचा आवाज ऐकू येतो) आणि हृदयाचे ठोके. ते ऐकण्यासाठी लोकांची मोठी रांग लागली आहे.

राष्ट्रीय गांधी संग्रहालय : राष्ट्रीय गांधी संग्रहालयाचे क्युरेटर अन्सार अली यांनी सांगितले की राष्ट्रीय गांधी संग्रहालय महात्मा गांधींचे जीवन, कार्य आणि तत्त्वज्ञान यांचे संपूर्ण विहंगावलोकन सादर करते. 1948 मध्ये गांधींच्या हौतात्म्यानंतर लवकरच एक नम्र प्रयत्न म्हणून जे सुरू झाले. ते 1961 मध्ये विद्यमान राष्ट्रीय गांधी संग्रहालयात हस्तांतरित करण्यात आले.गांधीजींचे संपूर्ण जीवन संग्रहालयात छायाचित्र, दृश्य माध्यमे, साहित्यक यांच्या माध्यमातून ठेवम्यात आले आहे. याशिवाय संग्रहालयाच्या ग्रंथालयात सुमारे 44 हजार दुर्मिळ पुस्तके आणि मासिके आहेत. गांधीजींनी संपादित केलेल्या किंवा प्रकाशित केलेल्या साप्ताहिक पत्रांचा संग्रह, जगप्रसिद्ध नेत्यांशी त्यांनी केलेल्या पत्रव्यवहाराच्या छायाप्रतही आहेत.

महात्मा गांधी जयंती

प्रेक्षकांसाठी काय खास : चरखा गॅलरी एका वेगळ्या प्रकारच्या संघर्षाची कहाणी सांगते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात चरख्याची अनोखी भूमिका होती. या दालनात चरखाचा विकास आणि इतिहास चित्रित करण्यात आला आहे. येथे पाहुण्यांना पंडित जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद आणि इतर नेत्यांनी कातलेले सूत पाहता येईल. यासोबतच प्रेक्षकांना विविध प्रकारचे चरखाही पाहायला मिळतात. याशिवाय गांधीजींचे जीवन छायाचित्र प्रदर्शनातून दाखविण्यात आले आहे.

300 छायाचित्रांचे प्रदर्शन : छायाचित्र प्रदर्शनात गांधींच्या बालपणापासून ते मृत्यूपर्यंतची 300 छायाचित्रे ठेवण्यात आली आहेत. त्यात गांधीजींच्या स्मृतिचिन्हही प्रदर्शित करण्यात आले आहेत. गांधीजींचा चष्मा, मायक्रोस्कोप, पेन, घड्याळ, चप्पल, भांडी, पुस्तके, डायरी, दांडी यात्रेत वापरण्यात येणारी काठी. हे सर्व येथे प्रदर्शित केले ( belongings related to Gandhiji can see In museum ) आहेत. गांधींनी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या लग्नात सादर केलेली साडी ही येथे आकर्षणाचे केंद्र ठरते. अनेक वस्तू प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.गांधीजींच्या अस्थी या खादीच्या कापडाने झाकल्या होत्या.गांधीजींच्या अस्थी या खादीच्या कापडाने झाकल्या होत्या.

वृत्तपत्रांतील क्लिपिंग्ज : गॅलरीत गांधीजींच्या अस्थींची राख, रक्ताने माखलेली चादर, धोतर, त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेली एक गोळी, आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्यांच्याकडे असलेले खिशातील घड्याळ हे सर्व येथे पाहता येईल. विशेष म्हणजे येथे समकालीन वृत्तपत्रांच्या क्लिपिंग्ज, देश-विदेशातून त्यांच्या बलिदानावर पाठवलेले संदेश आणि त्यांच्या प्रेमाचे दर्शन घडते. सोबतच फिनिक्स, साबरमती आणि सेवाग्राम आश्रमांचे मॉडेलही येथे दाखविण्यात आले आहेत. याशिवाय अनेक कलाकारांनी वेगवेगळ्या माध्यमातून साकारलेली गांधीजींची चित्रेही आहेत.

गांधीजींचा आवाज : संग्रहालयाच्या दुसऱ्या मजल्यावर चार दूरध्वनी आहेत. या टेलिफोन्सचा रिसीव्हर कानाला लावताना गांधीजींची रेकॉर्ड केलेली भाषणे ऐकू येतात. 11 जून 1947 रोजी दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये गांधीजींच्या भाषणातील उतारे ऐकले आहेत. सर्वसामान्य प्रेक्षक आणि लहान मुले कित्येक मिनिटे हे आवाज ऐकताना दिसतात. याशिवाय गांधीजींच्या हृदयाचे ठोकेही ऐकू येतात, त्यासाठी तुम्हाला दुसऱ्या गॅलरीत जावे ( Mahatma Gandhi heartbeat can still be heard ) लागेल. याशिवाय गांधीजी आणि इतर नेत्यांशी संबंधित लघुपटही येथे दाखविण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.