कर्नाटक - कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार याचे हृदविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. आज त्यांच्या बेंगळुरू येथील श्री कंतीरवा स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि इतरांच्या उपस्थितीत पुनीत राजकुमार यांना राज्यसन्मान देण्यात आला.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बंगळुरूमधील श्री कंतीरवा स्टुडिओमध्ये अभिनेता पुनीत राजकुमार यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच यावेळी कंतीरवा स्टुडीओत सिनेसृष्टीतील मान्यवर आणि राजकीय नेतेही उपस्थित आहेत.