नवी दिल्ली/काबुल - तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा घेतल्यानंतर अनेक नागरिकांसह सरकारमधील मंत्र्यांनाही जीवाच्या भीतीने विदेशात पळून जावे लागले आहे. अशा परिस्थितीतही अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी हार मानलेली नाही. त्यांची 25 वर्षीय मुलगी फ्रोहर सालेहने पित्याबद्दल अभिमान व्यक्त करत तालिबानचा पराभव करू, असे म्हटले आहे.
फ्रोहर सालेहने ट्विटमध्ये म्हटले, की माझ्या आदरणीय वडिलांबरोबर थोडक्यात संवाद साधला आहे. तालिबान आणि पाकिस्तानच्या विरोधात भूमिका घेतल्याने वडिलांचा अभिमान आहे. त्यांना संपूर्ण देशाचा अभिमान आहे. ते कधीही हार मानणार नाहीत. ते तालिबानपुढे झुकणार नाहीत. विजय आमचाच आहे. अफगाणिस्तानच्या बाजून राहा #StandWithAfghans आणि तालिबानने जायला हवे #BeGoneTaliban या आशयाचे हॅशटॅग तिने वापरले आहेत.
हेही वाचा-BH SERIES राज्य बदलले तरी वाहनांची करावी लागणार नाही पुनर्नोंदणी
आत्मा मातीशी एकत्रित जोडलेली असणार
माझ्या ह्रदयातील न पुसता येणारे लाल रंगाचे रक्त हे अफगाणिस्तानचे आहे. येथून केवळ ईश्वरच माझ्या आत्म्याची मुक्तता करू शकते. तोपर्यंत माझी आत्मा मातीशी एकत्रित जोडलेली असणार आहे. माझ्या मालकीचे अफगाणिस्तान आहे. अफगाणिस्तानकडे माझी मालकी आहे.
हेही वाचा-म्हैसूर सामूहिक बलात्कार प्रकरण : तामिळनाडूतील पाच आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
अमुरुल्लाह सालेह यांनी नुकतेच केले होते ट्विट
अमुरुल्लाह सालेह यांनी ट्विट करून आपली भूमिका मांडली होती. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते, की देशाने कायद्याचा आदर केला पाहिजे, हिंसेचा नाही. पाकिस्तानला गिळण्यासाठी अफगाणिस्तान खूप मोठा आहे. ते तालिबान्यांना शासन करण्यासाठीदेखील मोठे आहे. तुमच्या इतिहासात दहशतवादी गटांपुढे झुकणे आणि अपमानीत होणे याबद्दलचा अध्याय होऊ देऊ नका, असा संदेशदेखील सालेह यांनी ट्विटद्वारे अफगाणिस्तानच्या जनतेस दिला होता.
अफगाणिस्तानमध्ये अत्यंत भयावह स्थिती -
गेल्या दोन दशकांपासून अफगाणिस्तानात सुरू असलेल्या गृहयुद्धातून अमेरिका आणि नाटो सैन्याने माघार घेताच तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला आहे. तालिबानच्या ताब्यात अफगाणिस्तान गेल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण तयार झाले. काबुल विमानतळावरील बॉम्बस्फोटात 100 हून अधिक जणांचा गुरुवारी मृत्यू झाला. तरीही तालिबानच्या जुलमी राजवटीत राहण्यापेक्षा नागरिक देश सोडण्याचा विचार करत आहेत. काबूलमधून बाहेर जाणाऱ्या विमानांमध्ये बसण्यासाठी नागरिकांची झुंबंड उडाली आहे.
हेही वाचा-भाजपचे 50 टक्क्यांनी उत्पन्न वाढले आणि तुमचे? राहुल गांधींचा टोला