ETV Bharat / bharat

Friendship day Special : जेव्हा! मित्रांची जादू एका अपंग मुलाच्या चेहऱ्यावर हास्य आणते; गोष्ट एका मधुची - मित्रांची जादू एका अपंग मुलाच्या चेहऱ्यावर हास्य आणते

आज ऑगस्ट महीन्यातील पहीला रविवार. म्हणजे 'फेंडशिप डे' चा (Friendship day Special) दिवस. आज आपण फेंड शिप डे निमीत्य एक कथा बघणार आहोत. ज्यामध्ये एका अपघातात अपंग झालेल्या मित्राला त्याचे मित्र कसे मदत करतात, हे दिसुन येतं. ज्यावेळी आपण स्वत: पेक्षा जास्त आपल्या गरजु मित्राची काळजी घेतो आणि त्याच्या आनंदात (FRIENDS MAGIC BRING SMILE ON FACE) आपला आनंद मानतो. तिच खरी मैत्री आणि तोच खरा मैत्री दिवस होय.

Friendship day Special
फ्रेंडशिप डे स्पेशल
author img

By

Published : Aug 7, 2022, 4:05 PM IST

दु:ख अडवायला उंबऱ्या सारखा

मित्र, वणव्यामध्ये गारव्या सारखा

आत्महत्याच करणार नाही कोणी,

मित्र असला जवळजर मनासारखा,

मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा

आज या ओळींची आठवण का झाली असेल? ऑगस्ट महीन्यातील पहीला रविवार, म्हणजे 'फेंडशिप 'डे' चा (Friendship day Special) दिवस. कवि अनंत राऊत यांनी लिहले ओळी मित्राचे जिवनात किती महत्व आह, हे पटवून देतात. मित्र, मैत्रीणी सोबत असले की, सर्व अडचणीवर मात करता येते. सुख दु:ख मित्रांच्या सहवासाने हलके कराता येते. ये दोस्ती हम नही तोंडेगें असे किती तरी गीत मित्रांचे महत्व सांगून जातात. याच निमित्त आज आपण एका मित्रांची गोष्ट बघणार आहोत. म्हणजे 'फेंडशिप 'डे' स्पेशल स्टोरी (Friendship day Special) दिवस. एका अपघातात अपंग झालेल्या मित्राला त्याचे मित्र कसे मदत करतात, हे दिसुन येतं. ज्यावेळी आपण स्वत: पेक्षा जास्त आपल्या गरजु मित्राची काळजी घेतो आणि त्याच्या आनंदात (FRIENDS MAGIC BRING SMILE ON FACE) आपला आनंद मानतो. तिच खरी मैत्री, तोच खरा मैत्री दिवस होय.

गारेड्डी जिल्ह्यातील कोंकोल येथील एक मधु कुमार नावाचा मुलगा राहात होता. तो इयत्ता पाचवीत असताना त्याला विजेचा धक्का बसला होता. गंभीर दुखापतीमुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचे पाय आणि हात काढावे लागले. अनेक दिवस तो हॉस्पिटलच्या बेडवर खिळुन होता. त्यानंतर तो बरा झाला असला, तरी कोरोनाच्या प्रभावामुळे त्याला शाळेत जाता आले नाही. आता शाळा पूर्ण क्षमतेने सुरू असल्याने तो दररोज शाळेत जातो. मधुच्या मित्रांना दुःखाने ग्रासलेल्या त्यांच्या मित्राचे हसणे पाहायचे होते. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी आपली कल्पना शिक्षकांना सांगितली. सर्वांनी मिळून एक चमत्कार केला.

हा चमत्कार घडण्यास कारण असे होते की, एके दिवशी अशोक नावाच्या शिक्षकाने मुलांना वर्गात खेळ खेळायला लावले. तो खेळ खेळण्यात सगळे गुंतलेल होते. मात्र, मधु हा खेळ खेळु शकत नव्हता,तो शांत बसला होता. त्याच वेळी, शिक्षक आणि सहकारी विद्यार्थ्यांना मधुच्या डोळ्यात काही वेदना जाणवल्या. आपला मित्र हीरमुसला आहे. हे बघुन लगेच, विद्यार्थ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपली कल्पना शिक्षकांना सांगितली. आणि सर्वांनी मिळून एक चमत्कार केला. मधुचे मित्रच त्याचे खरे हात पाय बनले. मधु हात हलवत त्याच्या सहकारी विद्यार्थ्यांना नमस्कार करत होता. तो बसूनही नाचत होतो. तुम्हाला शंका असेल की त्यात काय विशेष आहे. पण विशेषता ही आहे की, ते पाय आणि हात मधु कुमारचे नव्हते. गणेश नावाचा विद्यार्थी मधु कुमारच्या मांडीवर बसला आणि त्याचे पाय आणि हात बनला. त्यांनी ही जादू इतक्या चपळाईने केली की, नवोदितांना कळलेच नाही की; मधुला हात आणि पाय नाहीत. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली, मुलेच मधुचे पाय आणि हात बनले... आणि मधुचे डोळे आनंदाने भरुन आले.

संगारेड्डी जिल्ह्यातील कोंकळ हे त्यांचे मूळ गाव. तो खूप छान हसतो. मधुकुमार शाळेत आल्यापासून, त्याचे मित्र त्याच्या सोबत असतात. त्याला भात खाऊ घालणे, पाणी पाजणे, त्याला बाहेर नेणे, खेळ खेळण्यास मदत करणे, इत्यादी त्याच्या संबंधीत संपुर्ण जबाबदारी मित्रच पूर्णपणे पार पाडू लागले आहेत. त्यामुळे हातपाय गमावल्याच्या दु:खातही मधुचे डोळे आनंदाने भरुन येण्याचे कारण हे मित्र आहेत.

मधु कुमार म्हणतो की, 'मी पाचवीत असताना विजेच्या धक्क्याने माझे पाय आणि हात गमावले. आता मी 8 वीत आहे. माझ्या शाळेत माझे चांगले मित्र आहेत. दररोज ते मला शाळेत घेऊन जातात. मला कुठेही जायचे आहे, तर माझे मित्रच मला तिथे नेतात. माझ्या मित्रांनी तर मला कॅरम खेळायलाही मदत केली. मला हात नसल्यामुळे जेवणाच्या सुट्टीत ते मला जेवण भरवुन द्यायचे. माझे मित्र खरोखरच मला याची जाणीव करुन देतात की, मला कोणतेही अपंगत्व नाही. जेव्हा मी त्यांच्यासोबत असतो तेव्हा, मला मी त्यांच्यासारखाच सामान्य वाटतो.'

मधुचे वर्गशिक्षक अशोक सांगतात की, 'एक दिवस मी वर्गात एक उपक्रम दिला. मधूला अपंगत्वामुळे त्या उपक्रमात सहभागी होता आले नाही. त्या दिवशी मी त्याला उदास पाहिले होते. त्याच्या मित्रांनी आपल्या कल्पक बुध्दीचा वापर केला व तेच त्याचे हात-पाय बनले. मग ते त्याला रोज मदत करू लागले. ते मधूचे हातपाय बनून त्याला प्रत्येक गोष्टीत मदत करत होते. आता मधु त्यांच्या मदतीने नाचू शकते. त्या दिवसापासून मी मधुला कधीच उदास होताना पाहिले नव्हते. आता त्याच्या मित्रांनी घेरल्यामुळे तो खूप आनंदी आहे.'

या कथेच्या माध्यमातुन आपल्याला खरे मित्र कोण असतात; ते आज नक्की कळले असणार. अपंगत्वाने ग्रासलेल्या मधुच्या आयुष्यात तेज भरणारे मित्र म्हणजेच मैत्रीचा खरा धागा. "हॅपी फ्रेंडशिप डे"

हेही वाचा :Friendship Day 2022 : ऑगस्टच्या पहिल्याच रविवारी फ्रेंडशिप डे का साजरा करतात? जाणून घ्या...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.