ETV Bharat / bharat

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक : चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात

चौथ्या टप्प्यात पश्चिम बंगालमधईल 5 जिल्ह्यांतील 44 जागांवर मतदान होत आहे. यापैकी 8 जागा अनुसूचित जाती आणि 3 जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. या 44 जागांवर एकूण 373 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक : चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक : चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात
author img

By

Published : Apr 10, 2021, 7:20 AM IST

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला शनिवारी सकाळी सुरूवात झाली आहे. या टप्प्यात एकूण 44 जागांसाठी मतदान होत आहे.

373 उमेदवार निवडणूक रिंगणात

चौथ्या टप्प्यात पश्चिम बंगालमधईल 5 जिल्ह्यांतील 44 जागांवर मतदान होत आहे. यापैकी 8 जागा अनुसूचित जाती आणि 3 जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. या 44 जागांवर एकूण 373 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. एकूण 34 राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असून 373 पैकी 153 उमेदवार हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.

1.15 कोटी मतदार मतदानास पात्र

चौथ्या टप्प्यात एकूण 1,15,81,022 मतदार मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी पात्र आहेत. यात 58,82,514 पुरुष आणि 56,98,218 महिलांचा समावेश आहे. याशिवाय 290 तृतीयपंथी मतदारही मतदानासाठी पात्र आहेत. चौथ्या टप्प्यासाठी एकूण 15940 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी सीआरपीएफच्या 789 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

दिग्गजांचे भवितव्य होणार मतपेटीत बंद

चौथ्या टप्प्यात अनेक दिग्गजही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी तसेच अरुप बिस्वास अशा दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.