ETV Bharat / bharat

कोडरमा औष्णिक प्रकल्पात लिफ्ट कोसळल्याने चार जणांचा मृत्यू; मृतामध्ये महाराष्ट्राचे दोन - विजय कन्स्ट्रक्शन कंपनी नागपूर

मृतामध्ये विजय कन्स्ट्रक्शन कंपनीचे ऑपरेटर महाराष्ट्राचे रहिवासी कृष्णा प्रसाद कोडाली यांचा समावेश आहे. ही कंपनी नागपुरची आहे.

कोडरमा औष्णिक प्रकल्पात लिफ्ट कोसळल्याने चार जणांचा मृत्यू

author img

By

Published : Aug 27, 2021, 4:37 PM IST

रांची (झारखंड) - झारखंडमधील कोडरमा येथील औष्णिक विद्युत प्रकल्प केंद्रात मोठी दुर्घटना घडली आहे. प्रकल्पात चिमणीचे काम सुरू असताना लिफ्ट कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कोडरमा औष्णिक विद्युत प्रकल्प केंद्रात 80 फूट उंचीवर बांधकाम करण्यात येत आहे. या कामाचे परीक्षण करण्यास गेलेल्या चार जणांचा गुरुवारी उशिरा मृत्यू झाला आहे. लिफ्टचे वायर तुटल्याने लिफ्ट कोसळली. लिफ्टची वायर तुटल्याने 20 कामगारांपैकी 2 कामगार हे चिमणीवर अडकले होते. शुक्रवारी सकाळपर्यंत कामगारांची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

कोडरमा औष्णिक प्रकल्पात लिफ्ट कोसळल्याने चार जणांचा मृत्यू

हेही वाचा-थेट इंग्लंडहून पहिल्यांदाच अहिराणी भाषेत... खान्देशातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत काय म्हणाले डॉ. संग्राम पाटील

मृतामध्ये महाराष्ट्रातील दोन जणांचा समावेश

मृतामध्ये विजय कन्स्ट्रक्शन कंपनीचे ऑपरेटर महाराष्ट्राचे रहिवासी कृष्णा प्रसाद कोडाली यांचा समावेश आहे. ही कंपनी नागपुरची आहे. मृतामध्ये कर्नाटकमधील रायचूरचे अभियंता कार्तिक सागर, बिहारमधील गयाचे रहिवासी सुरक्षा अधिकारी नवीन कुमार आणि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विनोद कुमार चौधरी यांचा समावेश आहे.

हेही वाचा-ईडीकडून एकनाथ खडसेंची नेमकी कोणती मालमत्ता जप्त? महसूल विभागही अनभिज्ञ? चर्चांना उधाण

दुर्घटनेनंतर कोडरमा औष्णिक प्रकल्प केंद्राचे मुख्य अभियंता उदय कुमार यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. कोणत्या कारणाने दुर्घटना घडली, याचा शोध घेण्यात येत आहे.

हेही वाचा-नाशकातील फरार शिवसैनिकांनी घेतली संजय राऊत यांची भेट

26 जुलैला वरळीत लिफ्ट कोसळल्याने घडली होती दुर्घटना

वरळी येथील लिफ्ट दुर्घटनेतील 6 जणांचा 26 जुलैला मृत्यू झाला. अंबिका डेव्हलपरच्या माध्यमातून नवीन इमारत बांधण्याचे काम सुरू असताना इमारतीची लिफ्ट कोसळून शनिवारी पाच कामगारांचा मृत्यू तर एक जण जखमी झाला. जखमीवर परळ येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्या कामगाराचाही मृत्यू झाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.