ETV Bharat / bharat

राजस्थानमध्ये भीषण अपघात; तीन चिमुरड्यांसह वडिलांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव चारचाकी एका ट्रेलर ट्रकला धडकल्यामुळे हा अपघात झाला. यामध्ये चार, पाच आणि दहा वर्षांच्या चिमुरड्यांसह त्यांच्या वडिलांचाही मृत्यू झाला. ही टक्कर एवढी जोरदार होती, की दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर, वडील आणि तिसऱ्या मुलाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला...

Four including three children die in Rajasthan accident
राजस्थानमध्ये भीषण अपघात; तीन चिमुरड्यांसह वडिलांचा मृ्त्यू
author img

By

Published : Apr 29, 2021, 11:05 AM IST

जयपूर : राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात झालेल्या एका अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश होता. जोधपूर-बारमेर राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी रात्री ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव चारचाकी एका ट्रेलर ट्रकला धडकल्यामुळे हा अपघात झाला. यामध्ये चार, पाच आणि दहा वर्षांच्या चिमुरड्यांसह त्यांच्या वडिलांचाही मृत्यू झाला. ही टक्कर एवढी जोरदार होती, की दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर, वडील आणि तिसऱ्या मुलाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

बोरानाडाचे पोलीस अधीक्षक किशनलाल विश्रोयी, सहाय्यक अधीक्षक मंगीलाल राठोड हे घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोहोचले होते. या अपघाताची चौकशी सुरू आहे. तसेच, मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती राठोड यांनी दिली.

हेही वाचा : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना कोरोनाची लागण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.