ETV Bharat / bharat

UP Car Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत कारचा चक्काचूर.. चार जण जागीच ठार..

बस्ती येथील कप्तानगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर कार उलटल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू ( Four Died In Car Accident ) झाला. मृत गोरखपूर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत ( car accident in Basti ) आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्याचवेळी सुलतानपूर येथे मिनी बस पिकअपला धडकल्याने २६ प्रवासी जखमी झाले.

Four Died In Car Accident
कारच्या अपघातात चौघांचा मृत्यू
author img

By

Published : Jun 16, 2022, 12:19 PM IST

बस्ती/सुलतानपूर/सहारनपूर ( उत्तरप्रदेश ) : बस्ती जिल्ह्यातील कप्तानगंज पोलीस स्टेशन परिसरात खजुहाजवळ राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात अवजड वाहनाने कारला धडक दिल्याने पती, पत्नी आणि मुलासह एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू ( Four Died In Car Accident ) झाला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे. मृत गोरखपूरच्या पास्टर मार्केटमधील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत ( car accident in Basti ) आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्याचवेळी, दुसऱ्या घटनेत, अयोध्येला भेट देऊन परतणाऱ्या डझनभर प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स बस सुलतानपूरमध्ये उभ्या असलेल्या पिकअपला धडकली. या अपघातात ४ प्रवासी गंभीर जखमी झाले असून, उर्वरित प्रवाशांनाही दुखापत झाली आहे. दुसरीकडे सहारनपूरमध्ये दोन ट्रकची धडक होऊन चालक गंभीर जखमी झाला आहे.

गोरखपूरमधील चार जण ठार, तीन जखमी: बस्ती जिल्ह्यातील कप्तानगंज पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील खजुवा गावाजवळ फतेहपूर जिल्ह्यातून गोरखपूरकडे जाणाऱ्या कारला भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. धडकेनंतर कार महामार्गावर अनेकवेळा उलटली आणि लांबपर्यंत घसरत गेली. कारमध्ये असलेल्या गोरखपूरच्या पास्टर बाजार येथील रहिवासी पती-पत्नी आणि मुलासह चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

कार कापून अडकलेले मृतदेह काढण्यात आले : अपघातानंतर आरडाओरडा ऐकून स्थानिक जमा झाले आणि त्यांनी कप्तानगंज पोलीस ठाण्यात अपघाताची माहिती दिली. कप्तानगंज पोलिसांनी कार कापून त्यात अडकलेले मृतदेह बाहेर काढले. तर, जखमींना जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले, तेथून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना गोरखपूरला रेफर करण्यात आले. भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने कारला धडक देऊन पळ काढल्याचे स्थानिकांनी सांगितले. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले शोक, योग्य उपचाराचे आदेश : गोरखपूरच्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. ट्विट करताना मुख्यमंत्र्यांनी बस्ती जिल्ह्यातील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी प्रार्थना करतानाच मुख्यमंत्र्यांनी शोकग्रस्त कुटुंबीयांच्याप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

  • #UPCM @myogiadityanath ने जनपद बस्ती में सड़क दुर्घटना से हुई जनहानि पर गहरा शोक प्रकट किया है।

    मुख्यमंत्री जी ने दिवंगत आत्माओं की शांति की कामना करते हुए शोक संतप्त परिजनों के प्रति संवेदना व्यक्त की है।

    — CM Office, GoUP (@CMOfficeUP) June 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दोन ट्रकची धडक : सहारनपूर जिल्ह्यातील मिर्झापूर पोलीस ठाण्याच्या खुशालपूर गावाजवळ गुरुवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास सहारनपूर-विकासनगर रस्त्यावर दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. तर दुसऱ्या ट्रकच्या चालकाने उडी मारल्याने त्याचा जीव वाचला. पोलिसांनी खिडक्यांच्या काचा फोडून ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले व सीएचसी सदौली कदीम येथे दाखल केले.

अयोध्येला भेट देऊन तेलंगणाला जाणारी मिनी बस सुलतानपूरमध्ये कोसळली, २६ जखमी : भाविकांनी भरलेली मिनी बस अयोध्येला जाऊन परतताना सुलतानपूरला अपघात झाला. लखनौ-वाराणसी महामार्गावर दोन डझनहून अधिक प्रवासी घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स बस पार्क केलेल्या पिकअपला धडकली. या अपघातात 26 प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील एका कॉलनीतील दोन डझनहून अधिक लोक 10 जून रोजी गया, अयोध्या आणि काशी यात्रेसाठी तेलंगणातून निघाले होते. 15 जून रोजी पहाटे साडेतीन वाजता भाविकांनी भरलेली बस सुलतानपूरच्या लंबुआ कोतवाली भागातील बेदुपारा येथे पोहोचली तेव्हा चालकाला झोप आली होती. लखनौ-वाराणसी महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या बसने आंब्यांनी भरलेल्या पिकअपला धडक दिली. त्यामुळे बसमधील २६ जण जखमी झाले. सर्वांना लंबुआ सीएचसी येथून जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

हेही वाचा : Kedarnath Disaster : केदारनाथ प्रलय : हजारो लोकांना वाहून घेऊन गेली होती मंदाकिनी नदी.. 'अशी' झाली होती दुर्घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.