लखनऊ : उत्तर प्रदेशात आधी एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिचे नाव बदलले आणि त्यानंतर तिला विकल्याची घटना समोर आली आहे. लखनऊ पोलिसांनी या प्रकरणी तत्परता दाखवत पाच तासांत मुलीला रेल्वे स्थानकावरून पकडले आणि चार आरोपींना अटक केली. पोलीस आता या धर्मांतराचा तपास करत आहेत. चौकशीत आरोपींनी सांगितले की, ते ग्रामीण भागातील मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचे आणि त्यांची बाहेरगावी विक्री करायचे. मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्यानंतर आमिर, जबीर, नजीर आणि वहाब या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मुलीवर धर्म बदलण्यासाठी दबाव टाकला : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनऊच्या ठाकूरगंजमध्ये राहणाऱ्या आमिरची लखनऊच्या रहिमाबादमध्ये राहणाऱ्या एका तरुणीशी दोन वर्षांपूर्वी ओळख झाली. या दरम्यान आमिरने नाव बदलून तरुणीला आपल्या जाळ्यात अडकवले व तिच्याशी अवैध संबंध प्रस्थापित केले. त्याने मुलीवर धर्म बदलण्यासाठी दबावही टाकला, मात्र मुलीने त्याचे म्हणणे ऐकले नाही. दोन दिवसांपूर्वी मुलीला भेटण्याच्या बहाण्याने बोलावून आमिरने साथीदारांसह तिचे अपहरण केले. तो रेल्वेले तिला विकण्यासाठी नेत होता. यावेळी मुलीने कशीतरी आरोपीच्या तावडीतून स्वत:ची सुटका केली आणि पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. यानंतर पोलिसांच्या विविध पथकांनी मुलीचा शोध सुरू केला. लोकेशनच्या आधारे, पोलिसांचे पथक हरौनी रेल्वे स्थानकावर पोहोचले आणि त्यांनी अवध आसाम एक्सप्रेस ट्रेनचा शोध घेतला. सुमारे तासाभर तपास केल्यानंतर मुलगी सापडली.
आरोपी मुलींची विक्री करणारी टोळी चालवत असे : चौकशीदरम्यान पकडलेल्या मुख्य आरोपी आमिरने कबुली दिली आहे की तो त्याच्या वडिलांसोबत मुलींची विक्री करणारी टोळी चालवत असे. तो ग्रामीण भागातील तरुणींना प्रेमामध्ये अडकवून मुंबईला घेऊन जायचा. तेथे काही दिवस मुलींना ठेवून तो त्यांची खरेदीदारांना विक्री करायचा. डीसीपी पश्चिम राहुल राज यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आमिर, जबीर, नजीर आणि वहाब यांचा समावेश आहे. नादिर आणि वहाब हे उन्नावचे रहिवासी आहेत. वडील जबीर आणि आमिर ठाकूरगंजचे रहिवासी आहेत. तर एक आरोपी झीशान अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.
हेही वाचा :