बंगळुरू - भारताच्या कर्नाटक राज्यातील एक राजकारणी व भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि त्यांच्या पत्नी चेनम्मा यांना कोरोनाची लागण झाली आहे. एच. डी. देवेगौडा हे 87 वर्षीय आहेत. यासंदर्भात त्यांनी टि्वट करून माहिती दिली.
पत्नी चेनम्मा आणि आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आम्ही कुटुंबातील इतर सदस्यासह आयसोलेशनमध्ये आहोत. गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी. पक्षाच्या कार्यकर्ते आणि हितचिंतकाना विनंती आहे, की त्यांनी घाबरू नये, असे गौडा यांनी टि्वट केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एच. डी. देवेगौडा यांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी एच. डी. देवेगौडा आणि त्यांच्या पत्नी चेनम्मा यांच्या आरोग्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करतो'' असे टि्वट केले आहे. दरम्यान गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांना कोरोनाची लागण झाली होती. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी स्वतः याबाबत ट्विट करुन माहिती दिली होती.
कोण आहेत एच. डी. देवेगौडा
एच. डी. देवेगौडा यांचा जन्म 18 मे 1933 रोजी म्हैसूरच्या (सध्याच्या कर्नाटकातील हसन) हलोरानसिपुरा तालुक्यातील हारदानहल्ली या गावी एक व्होकलीगा जातीच्या कुटुंबात झाला. त्याचे वडील शेतकरी होते. जून 1996 ते एप्रिल 1997 ह्या 10 महिन्यांच्या कालावधीमध्ये पंतप्रधानपदावर राहिलेले देवे गौडा 1994 ते 1996 दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री देखील होते. ह्याखेरीज त्यांनी आजवर भारत सरकारमध्ये अनेक मंत्रीपदे भूषवली आहेत.
हेही वाचा - इशरत जहां बनावट चकमक प्रकरण; सीबीआयने घेतले तीन दोषी पोलीस अधिकाऱ्यांचे आरोप मागे