नवी दिल्ली : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग ( amarinder singh joins bjp formally ) यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. अमरिंदर सिंग यांनी त्यांचा पक्षही भाजपमध्ये विलीन केला. पक्षात सामील झालेल्यांमध्ये त्यांचा मुलगा रण इंदर सिंग, मुलगी जय इंदर कौर, माजी आमदार करण कौर आणि माजी आमदार निर्मल सिंह यांचा समावेश आहे.
-
Former Punjab CM Capt Amarinder Singh joins BJP; merges his party Punjab Lok Congress (PLC) with BJP pic.twitter.com/nXCINNzNLI
— ANI (@ANI) September 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Former Punjab CM Capt Amarinder Singh joins BJP; merges his party Punjab Lok Congress (PLC) with BJP pic.twitter.com/nXCINNzNLI
— ANI (@ANI) September 19, 2022Former Punjab CM Capt Amarinder Singh joins BJP; merges his party Punjab Lok Congress (PLC) with BJP pic.twitter.com/nXCINNzNLI
— ANI (@ANI) September 19, 2022
काँग्रेसचे झारखंडचे प्रभारी अविनाश पांडे म्हणाले की, हे अत्यंत दुर्दैवी आहे. पांडे म्हणाले, ज्यांना जनतेने सर्वाधिक सन्मान आणि सर्वाधिक अधिकार दिले ते आज अशावेळी असे निर्णय घेत आहेत, ही दुर्दैवाची बाब आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून पंजाब लोक काँग्रेस हा नवा पक्ष स्थापन करणारे अमरिंदर सिंग यांनी आपल्या जवळच्या अनेक नेत्यांना आधीच भाजपमध्ये सामील करून घेतले आहे.
पंजाबमध्ये संघटन मजबूत करण्याच्या आणि जनसामान्य वाढवण्याच्या मोहिमेत गुंतलेल्या भाजपने आपल्या राज्य युनिटच्या संघात मोठ्या प्रमाणात बदल करण्याची तयारी केली आहे. असे मानले जात आहे की, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्ष लवकरच एक मोठी भूमिका अमरिंदर सिंग यांना देईल. ते पंजाबमध्ये प्रमुख भूमिका निभाऊ शकतात.
पंजाब विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी अमरिंदर सिंग यांनी पंजाब लोक काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. नवज्योतसिंग सिद्धू यांच्याशी झालेल्या संघर्षामुळे काँग्रेस हायकमांडच्या विरोधात आघाडी उघडली होती. त्यावेळी निवडणूक रणनीतीचा एक भाग म्हणून, अमरिंदर सिंग यांनी त्यांच्या अनेक जवळच्या मित्रांना भाजपमध्ये सामील केले होते, परंतु त्यांनी स्वत: त्यांच्या राजकीय पक्षाच्या बॅनरखाली भाजपशी युती करून निवडणूक लढवली.
अमरिंदर सिंग यांना त्यांची पटियालाची जागा वाचवता आली नाही. त्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही. आम आदमी पक्षाच्या झंझावातामध्ये भाजपचे मनसुबे धुळीस मिळाले. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी पाहता भाजपने आता राज्यातील संघटनेची पुनर्रचना सुरू केली असून अमरिंदर सिंग भाजपमध्ये सामील झाल्यामुळे पंजाबमध्ये पक्षाचा पाया वाढण्यास मदत होईल आणि पक्ष मजबूत होईल, असा विश्वास भाजपच्या रणनीतीकारांनी व्यक्त केला आहे.