ETV Bharat / bharat

Manohar Singh Gill Passes Away: माजी मुख्य निवडणूक आयुक्त आणि काँग्रेस नेते मनोहर सिंह गिल यांचे निधन - मनोहर सिंह गिल यांचे निधन

Manohar Singh Gill Passes Away: माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते मनोहर सिंह गिल (Manohar Singh Gill) यांचं रविवारी (१५ ऑक्टोबर) दिल्लीत निधन झालं. पद्मविभूषण पुरस्कार विजेते गिल यांनी दिल्लीतील साकेत इथल्या मॅक्स रुग्णालयात वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (former Chief Election Commissioner)

Manohar Singh Gill Passes Away
मनोहर सिंह गिल यांचे निधन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 15, 2023, 10:59 PM IST

नवी दिल्ली Manohar Singh Gill Passes Away : माजी केंद्रीय मंत्री मनोहर सिंह गिल हे काही काळ आजारी होते. त्याच्या जवळच्या लोकांनी ही माहिती दिली. ते 86 वर्षांचे होते. गिल यांच्या पश्चात पत्नी व तीन मुली असा परिवार आहे. गिल यांच्यावर सोमवारी दिल्ली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

  • पूर्व मुख्य चुनाव आयुक्त और कांग्रेस नेता मनोहर सिंह गिल का आज शाम निधन हो गया। उनका अंतिम संस्कार कल दिल्ली में किया जाएगा। pic.twitter.com/Ok7U83QysW

    — ANI_HindiNews (@AHindinews) October 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राजकारणात जाणारे पहिले माजी सीईसी: एका माजी सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा टी.एन. शेषन निवडणूक आयोगाचे प्रमुख असताना गिल आणि जीव्हीजी कृष्णमूर्ती यांना निवडणूक आयोगाचे सदस्य करण्यात आले होते. अधिकाऱ्याने सांगितले की, त्याच वेळी निवडणूक आयोगाला त्रिसदस्यीय मंडळ बनवण्यात आले होते. राजकारणात प्रवेश करणारे ते बहुधा पहिले माजी सीईसी होते. गिल काँग्रेस सदस्य म्हणून राज्यसभेत पोहोचले आणि 2008 मध्ये त्यांना केंद्रीय क्रीडा मंत्री बनवण्यात आले.

  • Extremely saddened at the passing away of Former Union Minister, Padma Vibhushan, Shri Manohar Singh Gill Ji.

    As a valued colleague in the UPA Govt and earlier as a civil servant, his contributions to development of the nation in varied fields like sports, electoral processes… pic.twitter.com/i2L5GCpS3B

    — Mallikarjun Kharge (@kharge) October 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मल्लिकार्जुन खरगे यांना शोक: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गिल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आणि देशाच्या विकासात त्यांनी दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली. "माजी केंद्रीय मंत्री, पद्मविभूषण मनोहर सिंह गिलजी यांच्या निधनाने खूप दुःख झाले," असे त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X (पूर्वीचे ट्विटर) वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे.' "संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारमधील एक मौल्यवान सहकारी म्हणून आणि त्याआधी लोकसेवक म्हणून क्रीडा, निवडणूक प्रक्रिया आणि कृषी यांसारख्या विविध क्षेत्रात राष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान दीर्घकाळ स्मरणात राहील," असे ते म्हणाले.

कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे ट्विट: पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीही गिल यांच्या निधनावर शोक व्यक्त केले आहे. त्यांनी 'X' वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, "माजी मुख्य निवडणूक आयुक्त आणि केंद्रीय मंत्री डॉ. मनोहर सिंह गिल यांच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. त्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत आणि मी वाहेगुरुजींना गिल यांच्या दिवंगत आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थना करतो.

हेही वाचा:

Meera Borwankar Book : अजित पवारांचा काहीही संबंध नाही; तत्कालीन विभागीय आयुक्तांची 'ईटीव्ही भारत'ला Exclusive माहिती

Uddhav Thackeray : समाजवादी परिवार अन् शिवसेना एकत्र; उद्धव ठाकरेंचा भाजपासह 'आरएसएस'वर हल्लाबोल

Sharad Pawar On BJP : देशात दिवसेंदिवस भाजपा....; शरद पवारांचा हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.