आग्रा Foreign Tourist Dies : आग्रा येथील फतेहपूर सिक्री मेमोरियलला भेट देत असताना एका विदेशी महिला पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही महिला पर्यटक सुमारे तासभर जखमी अवस्थेत स्मारकाजवळ जमिनीवर पडून होती. परंतु, या महिला पर्यटकाला वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत. रुग्णवाहिकाही तासभर उशिरा पोहोचल्यानं तिला प्राथमिक उपाचार मिळू शकले नाहीत. रुग्णवाहिका आल्यानंतर महिला पर्यटकाला एसएन रुग्णालयात पाठवण्यात आलं. मात्र, प्रकृती अधिकच बिघडत असल्याचं पाहून पर्यटकाला खासगी रुग्णालयात पाठवण्यात आलं. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी पर्यटकाला मृत घोषित केलं.
फतेहपूर सिक्री येथे विदेशी महिला पर्यटकाचा मृत्यू : भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अधीक्षक राजकुमार पटेल यांनी सांगितलं की, फ्रान्समधून 20 सदस्यांचा एक गट भारत भेटीसाठी आला होता. मृत सुझान (60) यांचाही त्यात समावेश होता. सुझानचा पती इस्मा, तिच्या कुटुंबातील इतर सदस्यही त्या गटात होते. आज सर्व फ्रेंच पर्यटक भरतपूरला भेट दिल्यानंतर फतेहपूर सिक्री मेमोरियलमध्ये पोहोचले होते. सिक्रीच्या आत, ख्वाबगाह स्मारकाजवळील रेलिंगजवळ सर्वजण सेल्फी घेत होते. तेव्हा सुझान 8 ते 9 फूट उंचीवरून जमिनीवर पडली.
डोक्याला मार लागल्यानं मृत्यू : सुझान खाली पडताच बेशुद्ध झाली. काही वेळानं सुझानला शुद्धीवर आली, मात्र, तिला भयंकर वेदना होत होत्या. सुझानचं डोकं जमिनीवर असलेल्या दगडावर आदळल्यानं तिला अंतर्गत जखमा झाल्या होत्या. सुझैनच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली आहे. डीएम आग्रा यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे. तिचं कुटुंबीय, ASI अधिकाऱ्यांनी सुझैनला वाचवण्याचा भरपूर प्रयत्न केला मात्र त्यांना त्यात यश आलं नाही.
निष्काळजीपणामुळं घडली दुर्घटना : फतेहपूर सिक्रीमध्ये ख्वाबगाह स्मारक आहे. चारही बाजूंनी लाकडी रेलिंगं आहे. पावसाच्या पाणी तसंच सूर्यप्रकाशामुळे लाकूड खराब झालयं. जिल्हाधिकारी भानुचंद्र गोस्वामी यांनी संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तपासानंतर जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येइल. मात्र, निष्काळजीपणामुळं परदेशी महिला पर्यटकाला आपला जीव गमवावा लागला. त्यांच्यासोबत आलेली 20 सदस्यीय टीम, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर सुझैनच्या आकस्मिक मृत्यूमुळं दुःखाचा डोंगर कोसळलाय.
कडक कारवाई करणार : यावर प्रतिक्रिया देताना जिल्हाधिकारी भानुचंद्र गोस्वामी म्हणाले की, ही दुःखद घटना आहे. 20 सदस्यीय फ्रेंच टीम फतेहपूर सिक्रीला भेट देण्यासाठी आली होती. आम्ही या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करत आहोत. तपासात जे दोषी आढळेल, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. रुग्णवाहिकेला घटनास्थळी पोहोचण्यास एक तास का लागला, याचाही तपास अधिकारी करत आहेत. मृतांच्या कुटुंबाप्रती आमच्या संवेदना. त्यांना पूर्ण मदत देण्याचा आमचा प्रयत्न आहे.