आंध्रप्रदेश - अवघ्या ५० रुपयांवरून सुरू झालेल्या भांडणात एका तरुणाला जीव गमवाला लागला आहे. ही घटना आंध्रप्रदेश राज्यात घडली. बाजी असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. कोतेश्वरा राव नामक व्यक्ती आपल्या दोन मित्रांसोबत दुध घेण्यासाठी दुकानावर गेला असता दुकानातील कर्मचारी बाजीसोबत त्याचा वाद झाला. त्यानंतर तिघांनी बाजीला मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला.
कोतेश्वराचा बाजीसोबत ५० रुपयांवरून वाद झाला. मात्र, शाब्दिक वादानंतर तिघांनी त्याला हाणामारी केली. यात बाजी बेशुद्ध पडला. त्याला सत्तनपल्ली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत मृताच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे. मृत व्यक्तीस दोन मुले आहेत.
छत्तीसगडमध्येही अशीच एक घटना -
किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या भांडणात छत्तीसगडमधील एका व्यक्तीने पत्नीचा खून केला तर स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना दुर्ग जिल्ह्यातील छावाणी गावात घडली होती. अवघ्या 50 रुपयांवरून सुरू झालेल्या भांडणातून पत्नीचा अंत झाला होता. , राजकुमार पटेल (४०) नामक व्यक्तीने पत्नीकडे ५० रुपये मागितले होते. मात्र, पत्नीने पैसे देण्यास नकार दिला. या छोट्याशा कारणावरून दोघांत भांडण सुरू झाले. रागाच्या भरात राजकुमारने पत्नी अनिता (३५) ला मारहाण सुरू केली. तरीही त्याचा राग शांत झाला नाही. जवळच पडलेला लोखंडी रॉड त्याने पत्नीच्या डोक्यात घातला. यात पत्नीचा मृत्यू झाला.