ETV Bharat / bharat

Football reunite kid with parents : हृद्यस्पर्शी! फुटबॉलमुळे हरवलेल्या मुलाची पालकांशी झाली भेट

author img

By

Published : Feb 3, 2023, 2:20 PM IST

फुटबॉल खेळामुळे हरवलेल्या मुलाचे आई-वडील सापडले आहेत. आधार कार्डसाठी बायोमेट्रिक तपासनीत बोटांचे ठसे तपासले असता सर्व गूढ उकलले आहे. मोहम्मद दानिश असे त्या मुलाचे नाव आहे. या हरवलेल्या मुलाचे मुंबईतील केअर सेंटरमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. त्याची 15 वर्षांखालील राष्ट्रीय फुटबॉल संघात निवड झाली आहे.

Football reunite kid with parents
फुटबॉलमुळे हरवलेल्या मुलाची - पालकांशी झाली भेट

हैदराबाद (तेलंगणा) : वयाच्या 6 व्या वर्षी मोहम्मद दानिश तेलंगणातील नारायणपेठ येथून बेपत्ता झाला होता. तो आत्तापर्यंत मुंबईतील एका केअर सेंटरमध्ये राहत होता. अंडर-15 राष्ट्रीय फुटबॉल संघात कागदपत्रे तपासताना त्यांच्या आई वडिलांचा तपास लागला. 15 वर्षांच्या दानिशची त्याच्या पालकांसोबत भेट झाली. आधारमधील बायोमेट्रिकमुळे हरवलेल्या मुलाचे आई-वडील सापडले आहेत.

16 डिसेंबर 2014 रोजी बेपत्ता झाला होता : मोहम्मद दानिश 16 डिसेंबर 2014 रोजी घरातून बेपत्ता झाला होता. शोध घेऊनही तो न सापडल्याने पालकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केली. मोहम्मद दानिश हा हैदराबादहून ट्रेनने मुंबईला पोहोचला. तेथे त्याला चाइल्ड केअर सेंटर (CWC) अधिकाऱ्यांनी उचलून शाळेत दाखल केले. तो सध्या नववीत शिकत आहे. अधिकाऱ्यांनी त्याच्या आधार बायोमेट्रिक्सद्वारे त्याचा पत्ता शोधण्याचे अनेकवेळा प्रयत्न केले होते. मात्र ते निष्फळ ठरले.

अंडर-15 राष्ट्रीय फुटबॉल संघासाठी निवड : नुकतीच त्याची अंडर-15 राष्ट्रीय फुटबॉल संघासाठी निवड झाली आहे. संघात त्याचा समावेश करण्यासाठी, संबंधित अधिकाऱ्यांना त्याचे पालक आणि मूळ ठिकाण शोधणे आवश्यक होते. त्यांना हे तपशील केअर सेंटरच्या अधिकार्‍यांकडून मिळू शकले नाहीत. परिणामी, फुटबॉल संघाने मुलाच्या नवीनतम बोटांच्या ठशांची चाचणी घेतली. त्यात त्याचा आधार क्रमांक आणि त्याच्या पालकांचा तपशील आढळला. नारायणपेटा जिल्हा मुख्यालयातील बहरपेट येथे वडिल मोहम्मद मोईज पत्नी शबाना यांसोबतच राहत होते.

फुटबॉलमुळे पालकांशी भेट झाली : दानिशसोबत भेट झाल्यानंतर पालांकीन आनंद व्यक्त केला. आपला मुलगा आता हरवणार नाही. देवाच्या कृपेने आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने तो घरी परतल्याचा आनंद आहे, असे त्याचे पालक म्हणाले. फुटबॉल संघ निवडकर्त्यांकडून तपशील जाणून घेतल्यानंतर, केअर सेंटरच्या अधिकार्‍यांनी नारायणपेट अधिकार्‍यांना माहिती दिली. महबूबनगरचे जिल्हा बाल कल्याण अधिकारी वेणुगोपाल आणि डीसीपीओ कुसुमा लता यांनी मुलाच्या पालकांना माहिती देऊन त्यांना मुंबईला पाठवले. ते गेले आणि आपल्या मुलासह परत आले. अधिकाऱ्यांनी मुलाला अधिकृत कागदपत्रांसह त्यांच्याकडे सोपवले.

मुंबईतही अशीच घटना घडली : भाईंदर पश्चिमेकडे असलेल्या एका मॉलजवळ गुरुवारी 24 जानेवारीला सायंकाळी ख्रिसमस मेळ्याला गेलेली दहिसर पूर्व येथील तीन मुले घरचा रस्ता (missing children in Christmas fair) चुकली. दहिसर पोलिसांना 10 तासांच्या तपासानंतर त्यांचा शोध लागला. तीनही मुलांनी उपाशी पोटी मॉलजवळ एक रात्र काढल्यानंतर ते तिघेजण अन्नाच्या शोधात परिसरात इतरत्र भटकत होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दहिसर पोलिसांच्या पथकाने तपासाला सुरूवात केली. मुलांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरुप पोहचवले. तीनही मुलांच्या कुटुंबीयांनी आपली मुले परत मिळल्यामुळे पोलिसांचे आभार मानले होते.

हेही वाचा :Parliament Budget Session : अदानी वादावर संसदेत जोरदार घोषणाबाजी, कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.