गुवाहाटी: तृणमूल काँग्रेसने गुवाहाटीतील रॅडिसन ब्लूसमोर गुरुवारी निदर्शने केल्यानंतर गुवाहाटीतील रॅडिसन ब्लूसमोर एनएसयूआयने पण निदर्शने केले. एनएसयूआयचे राज्य उपाध्यक्ष रक्तीम दत्ता यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी सरकारच्या विरोधात आणि विविध सरकारविरोधी घोषणाबाजी केली. एनएसयूआयच्या आंदोलकांनी हातात बॅनर घेऊन हाॅटेलवर मोर्चा काढला. परंतु पोलिसांनी त्यांना बॅरिकेट लावुन रोखले. आंदोलकांना पोलिसांनी अटक करून बसमधून नेले. दत्ता यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. भाजप आमदारांची खरेदी-विक्री करत असल्याची टीका त्यांनी केली.
आसाममधे आसाममध्ये पूरस्थिती बिकट बनली आहे. शेकडो हेक्टर शेतजमीन आणि घरे नदीत वाहून गेली आहेत.मात्र मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा हे महाराष्ट्रातील सरकार पाडण्याच्या कामात गुंतले आहेत अशी टीएमसी आणि एनएसयुआय ने टीका केली आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ४५ शिवसेना आणि आठ अपक्ष आमदारांसह गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू येथे तळ ठोकून आहे. तृणमूल काँग्रेस आणि एनएसयूआयच्या निषेधानंतर सीआरपीएफ आणि पोलिसांनी रेडिसन ब्लूच्या आसपास कडक सुरक्षा तैनात केली आहे.
महाराष्ट्रातील राजकीय भुकंपाच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण देशाचे लक्ष गुवाहाटी येथील हॉटेल रॅडिसन ब्लू वर केंद्रित आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार चे भवितव्य अवलंबुन आहे. या हॉटेलमध्ये जमलेले ४२ आमदार आहेत. महाराष्ट्रातील असंतुष्ट आमदारांचा एक गट बुधवारी सकाळी सुरतहून गुवाहाटी येथे दाखल झाला. सहा आमदार हॉटेलमध्ये दाखल झाले. तर इतर सात असंतुष्ट आमदार गुरुवारी सकाळी हॉटेलमध्ये दाखल झाले. या विषयावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र आज रात्री ते असंतुष्ट आमदारांची भेट घेणार असल्याचे निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले आहे.
हाॅटेल बाहेर निदर्शने मोर्चे येत आहेत. पोलीस बळाचा वापर करुन त्यांना अडवण्यात येत आहे. तर गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमधल्या 42 बंडखोर आमदारांचा (42 rebel MLAs from Maharashtra) फोटो आला समोर आला आहे. यात महाराष्ट्रातील 42 बंडखोर आमदार दिसत आहेत. यात 35 आमदार शिवसेनेचे आणि 7 अपक्ष आमदार दिसत आहेत. ते एकनाथ शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषना देत आहेत.