गुवाहाटी ( आसाम ) : आसाममधील पूरस्थिती अजूनही गंभीर ( Flood in Assam ) आहे. राज्यातील 35 पैकी 22 जिल्हे अजूनही बाधित आहेत. 61 महसूल मंडळातील एकूण 2,254 गावे पूरग्रस्त भागात असल्याची नोंद आहे. ASDMA नुसार, गेल्या सोमवारपर्यंत 2,152,415 लोकांना विनाशकारी पुराचा फटका बसला आहे. सोमवारी मृतांची संख्या आठ झाली असून एक जण बेपत्ता आहे.
जनावरे गेली वाहून : 27 जूनपर्यंत एकूण 1220,112 जनावरे पुरामुळे बाधित झाली आहेत. पुरात एकूण 2,774 जनावरे वाहून गेली आहेत. पूरग्रस्त भागात एनडीआरएफ, एसडीआरएफ, भारतीय लष्कर, अग्निशमन दल आदींचे बचावकार्य सुरू आहे. राज्यभरातील छावण्यांमध्ये एकूण 191,194 लोकांनी आश्रय घेतला आहे. पूरग्रस्त भागात सध्या 715 छावण्या उभारण्यात आल्या आहेत
शेतजमीनही बाधित : याशिवाय एकूण ७४,६५५.८९ हेक्टर शेतजमीन पुरामुळे बाधित झाली आहे. कपिली नदी अजूनही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. त्यामुळे आसाममध्ये परिस्थिती अजूनही सुधारलेली नाही.
हेही वाचा : आसाममध्ये पूरस्थिती अजूनही गंभीर : ७३ जणांचा मृत्यू