ETV Bharat / bharat

मोडक्या घरात आढळले पाच मानवी सांगाडे; दहा वर्षापूर्वीपासून घर होतं पडक्या अवस्थेत

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 29, 2023, 12:51 PM IST

Five Skeletons Found In House : चित्रदुर्ग शहरातील एका पडक्या घरात पाच मानवी सांगाडे आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. हे घर मागील दहा वर्षापासून पडक्या अवस्थेत होतं. त्यात हे मानवी सांगाडे आढळून आल्यानं शहरातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.

Five Skeletons Found In House
घटनास्थळाची पाहणी करताना पोलीस

बंगळुरू Five Skeletons Found In House : एक पडक्या घरात पाच मानवी सांगाडे आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. चित्रदुर्ग शहरातील जिल्हा कारागृह रोडवरील पडक्या घरात हे सांगाडे आढळल्यानं नागरिकांना मोठा धक्का बसला. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस उपाधीक्षक अनिल कुमार यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी जगन्नाथ रेड्डी (80) पत्नी प्रेमक्का, मुलगी त्रिवेणी, मुलगा कृष्णा रेड्डी, नरेंद्र रेड्डी आदी पाच जण या घरात राहात असल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे.

मोडक्या घरात आढळले सांगाडे : शहरातील मोडक्या घरात 5 सांगाडे आढळून आल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. शहरातील जिल्हा कारागृह रोडवरील एका घरात पाच जणांचे सांगाडे रहस्यमयरित्या सापडले आहेत. त्यामुळं ही माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक अनिल कुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घरात जगन्नाथ रेड्डी आणि त्यांचं कुटुंबीय राहत असल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे.

जगन्नाथ रेड्डी होते कार्यकारी अभियंता : या घरात जगन्नाथ रेड्डी हे राहत असल्याची तक्रार त्यांचे नातेवाईक पवन कुमार यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. जगन्नाथ रेड्डी हे बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होते. जगन्नाथ रेड्डी हे मूळचे दोड्डाववनहल्लीचे रहिवासी होते. मात्र निवृत्तीनंतर ते चित्रदुर्ग इथं राहात होते. मात्र त्यांच्या घरात पाच जणांचे मृतदेह आढळून आल्यानं त्यांच्या नातेवाईकांनाही मोठा धक्का बसला आहे.

अनेक वर्षापासून नातेवाईकांच्या नव्हते संपर्कात : जगन्नाथ रेड्डी हे निवृत्तीनंतर चित्रदुर्ग इथं राहात होते. त्यांच्या नातेवाईकांशी त्यांच्यासोबत कोणताही संपर्क होत नव्हता. मागील अनेक वर्षापासून ते त्यांच्या नातेवाईकांच्या संपर्कात नसल्याचं पवन कुमार यांनी यावेळी सांगितलं. या बंद घरात मानवी सांगाडे सापडले. त्यात जगन्नाथ रेड्डी, त्यांची पत्नी प्रेमक्का, मुलगी त्रिवेणी, मुलगा कृष्णा रेड्डी, नरेंद्र रेड्डी राहात असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

सांगाडे आढळल्यानं मृत्यूबाबत शंका : चित्रदुर्ग शहरातील कारागृह रोडवर आढळून आलेल्या पडक्या घरात पाच मृतदेह आढळून आले. मात्र या मानवी सांगाड्याबाबत मोठं गूढ निर्माण झालं आहे. पवन कुमार यांनी या घरात आढळून आलेल्या सांगाड्याप्रकरणी शंका उपस्थित केली आहे. त्यांच्या नातेवाईकांच्या मृत्यूबाबत त्यांना शंका असल्याचं त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे. हे पाचही सांगाडे जगन्नाथ रेड्डी, त्यांची पत्नी प्रेमक्का, मुलगी त्रिवेणी, मुलगा कृष्णा रेड्डी, नरेंद्र रेड्डी यांचे असावेत असा संशय त्यांनी व्यक्त करुन मृत्यूबाबतही संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी सांगाडे जप्त करुन वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा :

  1. मुलांचे मृतदेह जिवंत करण्यासाठी ६ तास मिठाखाली ठेवले झाकून, सोशल मीडियावर व्हिडिओ पाहून भाबड्या पालकांचा प्रयत्न
  2. UP News : इंजिनला लटकलेला मृतदेह घेऊन रुळावर धावत राहिली रेल्वे , दृश्य पाहून सर्वच हादरले
  3. वर्षभर आईच्या मृतदेहाजवळ राहिल्या मुली, पोलीस आल्यावर सांगाड्याला मारली मिठी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.