ETV Bharat / bharat

Today Top News : देशातील महत्त्वाच्या बातम्यांवर नजर एकाच क्लिकवर - Dikshabhoomi

देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात. (News stories of national and local importance )

Top News
पाच बातम्यांचा आढावा
author img

By

Published : Oct 6, 2022, 8:13 AM IST

1 ) 2022 च्या साहित्यातील नोबेल पुरस्कारासाठी सलमान रश्दी यांच्या नावाची चर्चा : सुप्रसिद्ध लेखक आणि बुकर पारितोषिक विजेते ज्येष्ठ साहित्यिक सलमान रश्दी (Salman Rushdie) हे 2022 च्या साहित्यातील नोबेल पारितोषिकाचे (Nobel Prize for Literature) प्रबळ दावेदार आहेत. या वर्षीच्या नोबेल पुरस्कारासाठी त्यांच्या नावाला पसंती असल्याची माहिती समोर आली आहे. हा पुरस्कर साहित्य क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींन देण्यात येतो.मीडिया रिपोर्टनुसार या पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची चर्चा आहे. ( Salman Rushdie May Get Nobel Prize )

2) दीक्षाभूमीला मिळणार अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा, केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार, फडणवीसांचे आश्वासन : दीक्षाभूमीला (Dikshabhoomi) अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे (Central Government) पाठपुरावा करू आणि दीक्षाभूमीच्या विकासाचा 190 कोटी रुपयांचा नवा आराखडा लवकरच मंजूर करू असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहे. ते काल नागपूर येथील दीक्षाभूमीवर 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यात बोलत होते.

3) आज संपूर्ण विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट : राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. परतीच्या पावसासाठी राज्यात पोषक वातावरण तयार झाले आहे. सध्या जरी पावसाने उघडीप दिली असली तरी हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार आज राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील पुणे वगळत अन्य जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

4) आज India vs South Africa पहिली वनडे; कोहली-रोहितच्या अनुपस्थितीत कॅप्टन धवन करणार कमाल ? : भारतीय क्रिकेट संघाने (India National Cricket Team) आपल्या घरच्या मैदानावर टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) 2-1 असा पराभव केला. आता दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज (6 ऑक्टोबर) लखनौच्या इकाना इंटरनॅशनल स्टेडियमवर (Ekana Cricket Stadium) होणार आहे.

5) पश्चिम बंगालमध्ये दुर्गा विसर्जनादिवशी मोठी दुर्घटना; पुरामुळे 7 जणांचा मृत्यू : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) बुधवारी रात्री दुर्गा विसर्जन दरम्यान मोठी दुर्घटना घडली. जलपायगुडी (Jalpaiguri) येथील माल नदीत (Mal River) विसर्जनादरम्यान अचानक आलेल्या पुरामुळे 7 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक अद्यापही बेपत्ता आहेत. याशिवाय अनेक जण अजूनही नदीत अडकले आहेत. एनडीआरएफची टीम रात्री उशिरापर्यंत बचावकार्य करत असल्याचे समजते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.