ETV Bharat / bharat

Hardoi Road Accident : हरदोई येथे भीषण रस्ता अपघात, ५ जणांचा मृत्यू तर ५ जण गंभीर जखमी - कार और ई रिक्शा की टक्कर

उत्तर प्रदेशातील हरदोई येथे एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला, तर ५ जण गंभीर जखमी झाले.

Hardoi Road Accident
हरदोई येथे भीषण रस्ता अपघात
author img

By

Published : Mar 28, 2023, 5:27 PM IST

हरदोई (उत्तर प्रदेश) : जिल्ह्यात मंगळवारी भीषण अपघात झाला. हरदोई-लखनौ महामार्गावर वॅगनाॅर आणि ई-रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी पाच जण गंभीर जखमी झाले.

मृतदेहाचा पंचनामा करून जखमींना रुग्णालयात पाठवले : अपघातानंतर काही वेळातच महामार्गावर शेकडो लोकांची गर्दी झाली आणि वाहतूक कोंडी निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तातडीने मदतकार्य सुरू केले आणि मृतदेहाचा पंचनामा करून जखमींना रुग्णालयात पाठवले. अद्याप मृत आणि जखमींबाबत अधिक माहिती मिळालेली नाही.

वाहनांची समोरासमोर धडक : मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाली देहात येथील नयागावजवळ एका वॅगनाॅर कारने ई-रिक्षाला धडक दिली. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, ई-रिक्षावाले हरदोई येथून घरी जात होते. कारस्वार लखनौहून हरदोईच्या दिशेने येत होते. त्यामुळे दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने संपूर्ण परिसर हादरला असून परिसरात शोककळा पसरली आहे. उत्तर प्रदेशातील हरदोई येथे एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला, तर ५ जण गंभीर जखमी झाले.

पाच जखमींना उपचारासाठी ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले : घटनास्थळी पोहोचलेले एसपी राजेश द्विवेदी यांनी घटनास्थळाची पाहणी करून पाच जणांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला. या अपघातात निष्पापांसह तिघांचा जागीच मृत्यू झाल्याचे एसपी राजेश द्विवेदी यांनी सांगितले. तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अपघातातील अन्य पाच जखमींना उपचारासाठी ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या गंभीर अपघातामुळे जवळच्या परिसरच नाहीतर संपूर्ण उत्तर प्रदेशच हादरला आहे. पोलीस मृत व्यक्ती आणि जखमी व्यक्तींबाबत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच या घटनेचा तपास सुरू आहे.

हे ही वाचा : Gunaratna Sadavarte: बार कौन्सिल यांच्याकडून गुणरत्न सदावर्ते यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई; 2 वर्षांसाठी केले निलंबित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.