हैदराबाद - तेलंगणा राज्यात मुसळधार पाऊस पडला आहे अनेक भागात रस्त्यावर कमरे इतकं पाणी साचल्याने, परिसराला नदीचं स्वरुप आलं. जोरदार पावसाने अनेक पडझडीच्या घटना घडल्या. जोगुलम्बा गडवाल जिल्ह्यातही मोठी दुर्घटना घडली. आयजा मंडलमधील कोतापल्ली येथे भिंत कोसळून तीन मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
ही घटना रात्री झोपेत असताना घडली. कुटुंबात एकूण सात सदस्य होते. यात पाच जणांचा मृत्यू झाला. तर दोन जखमी आहेत. रात्रीच्या मुसळधार पावसामुळे भिंत कोसळल्याचे स्थानिकांनी सांगितले.
शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे लोक आश्रयाच्या जागा शोधत आहेत. शहरातील रुग्णालये, हॉटेल आणि पोलीस ठाण्यामध्ये देखील पावसाचे पाणी शिरले आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिक अडकून पडले होते. पुरग्रस्त भागात अद्यापही बचावकार्य सुरू असून शहरातील सखल भागातील पाणी ओसरलेले नाही.
हेही वाचा - ASHISH MISHRA ARREST युपी पोलिसांकडून केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाला अटक