ETV Bharat / bharat

मंत्र्याचा थाट! पांढरेशुभ्र बूट समूद्राच्या पाण्यात भिजू नये म्हणून मच्छीमारांनी मंत्र्यांना घेतले उचलून; व्हिडिओ व्हायरल - व्हीआयपी संस्कृती

चेन्नईच्या तिरुवल्लूर गावी राजकीय व्हीआयपी संस्कृतीचे दर्शन घडले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून मंत्र्यावर टीका केली जात आहे.

अनिथा राधाकृष्णन
अनिथा राधाकृष्णन
author img

By

Published : Jul 9, 2021, 11:43 AM IST

Updated : Jul 9, 2021, 2:12 PM IST

चेन्नई - देशांमध्ये व्हीआयपी आणि सेलिब्रिटींना कायदे धाब्यावर बसवून, नियमांची पायमल्ली करून विशिष्ट वागणूक देण्यात येते. त्याचा त्रास सामान्य नागरिकाला मोठ्या प्रमाणात होतो. याची उदाहरणे वाचायला, पाहायला मिळत असतात. चेन्नईच्या तिरुवल्लूर गावी अशाच राजकीय व्हीआयपी संस्कृतीचे दर्शन घडले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून मंत्र्यावर टीका केली जात आहे.

बूट ओले होऊ नये म्हणून मच्छीमारांनी मंत्र्यांना घेतले उचलून

अनिथा राधाकृष्णन मच्छिमारांच्या बोटीत बसून समुद्रात पाहणी करायला गेले होते. मत्स्य व्यवसाय, पशूधन खात्यांचा कारभार आहे. पाहणी करून बोट किनाऱ्यावर आल्यावर अनिथा राधाकृष्णन यांचे पांढरेशुभ्र बूट समूद्राच्या पाण्यात भिजू नये म्हणून चक्क मच्छिमारांच्या कडेवर बसून त्यांनी किनारा गाठला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. अनिता राधाकृष्णन यांनी अद्याप यावर प्रतिक्रिया दिली नाही.

कोण आहेत अनिथा राधाकृष्णन?

अनिथा राधाकृष्णन भारतीय तमिळ राजकारणी आहेत. 2001 आणि 2006 मध्ये एआयएडीएमकेच्या तिकिटावर तिरुचेंदूर विधानसभा मतदार संघातून निवडून आले होते. राधाकृष्णन यांनी 2009 मध्ये द्रविड मुनेत्र कळगममध्ये प्रवेश केला. 2009 च्या पोटनिवडणुकीत तिरुचेंदूर मतदारसंघातून विजयी झाले. त्यानंतर 2011, 2016 आणि 2021 मध्येही या जागेवरुन ते विजयी झाले. 2021 मधील विजयानंतर त्यांना मंत्री करण्यात आले आहे.

हेही वाचा - मंत्री होताच ज्योतीरादित्य सिंधियाचे एफबी खाते हॅक, मोदीविरोधी आणि काँग्रेसचे कौतुक करणारे व्हिडिओ पोस्ट

Last Updated : Jul 9, 2021, 2:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.