देहरादूनः चारधाम यात्रा (Chardham Yatra) 3 मे पासून सुरू झाला आहे. 3 मेला गंगोत्री आणि यमुनोत्री धाम पासून (Chardham Yatra begins from May 3) यात्रेची सुरूवात होईल. याचबरोबर 6 मे ला केदारनाथ आणि 8 मे ला बद्रीनाथ बदरीनाथ धाम हा दर्शनासाठी खुला होईल. चार धामांची पहिली पूजा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नावाने केली जाईल.
उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेची भाविक आतुरतेने वाट पाहत आहेत. 3 मे ला गंगोत्री-यमुनोत्री, 6 मेला केदारनाथ आणि 8 मे ला बद्रीनाथची दारे सुरू होतील. चार धामांची पहिली पूजा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नावाने केली जाईल. पर्यटन मंत्री सतपाल महाराज (Tourism Minister Satpal Maharaj) यांनी सांगितले की, या चार धाम भारतीयांचे आराध्य दैवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची उत्तराखंडातील चारधाम यात्रेसंदर्भात अपार श्रध्दा आहे.
कोरोना दूर करण्यासाठी प्रार्थना
मुख्यमंत्री सतपाल महाराज यांनी सांगितले की, चार धामांमध्ये पहिली पूजा देशाच्या समृध्दीसाठी असेल. कोरोनामुळे संपूर्ण विश्वात पसरणारी महामारी कमी होण्यासाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत. चारधाम यात्रेच्या दरम्यान शुक्रवारी केदारनाथ धाम येथे रावल भीमाशंकर लिंग यांनी डेहराडून येथे पोहोचून सीएम निवासस्थानावर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची भेट घेतली. यावेळेस कॅबिनेट मंत्री गणेश जोशी उपस्थित होते.
हेही वाचा - Minor Daughter Killed Father : प्रेमात पडलेल्या अल्पवयीन मुलीने केली वडिलांची हत्या.. 'असे' आहे कारण..